शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दिल्लीच्या विकासासाठी हवे पंतप्रधानांचे आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 6:04 AM

अरविंद केजरीवाल; तुमच्या मुलाने आज तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीन नायगांवकर

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण झाले. पण आता निवडणूक संपली आहे आणि त्यासोबत राजकीय शत्रुत्वही संपले आहे. यापुढे सर्व पक्षांसोबत काम करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचे आहे, असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केले. रामलीला मैदानावर शपथविधीनंतर त्यांनी दिल्लीकरांशी संवाद साधला. दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि त्यांच्या  नेतृत्वातील केंद्र सरकारने आशीर्वाद द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘इन्कलाब जिंदाबाद’ अश्या घोषणांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. ‘मेरे प्यारे दिल्लीवासीयों’ असा उल्लेख करताच रामलीला मैदानावर टाळ््यांचा कडकडाट झाला. केजरीवाल म्हणाले की, आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेली पाच वर्षे दिल्लीतील प्रत्येक परिवारात आनंद पेरण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही तेच करणार आहे. आता तुम्ही आपापल्या गावी फोन करून सांगा...‘हमारा बेटा सीएम बन गया है’.या निवडणुकीत कुणी आम्हाला, कुणी भाजपला, तर कुणी काँग्रेसला मत दिले. पण आजपासून मी काँग्रेस आणि भाजपवाल्यांचाही मुख्यमंत्री आहे. गेली पाच वर्षे कुणासोबतही सावत्र व्यवहार केला नाही आणि पुढेही करणार नाही. एखादी वस्ती भाजपला मत देणार आहे, हे माहिती असतानाही त्यांचे काम केले. कारण तेदेखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.‘जगभरात डंका वाजवू’या निवडणुकीमुळे संपूर्ण देशात दिल्लीचा डंका वाजू लागला आहे. कुणी मोहल्ला क्लिनिकच्या धरतीवर योजना आणत आहेत, तर कुणी वीज मोफत देत आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण जगात दिल्लीचा डंका वाजेल, असे काम करण्याचा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.‘आम्ही माफ केले’‘निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी खूप राजकारण झाले. आमच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पण, आता आम्ही त्यांना माफ केले आहे. आमच्यापासून कुणी दुखावले असेल तर त्यांनीही झाले गेले विसरून जावे,’ असे आवाहन केजरीवाल यांनी केले.५० विशेष निमंत्रितसोहळ््यात मुख्य आकर्षण होते मुख्य व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेले ५० विशेष निमंत्रित. सफाई कामगार, रिक्षाचालक, शिक्षक, डॉक्टर, पोलीस, खेळाडू, विद्यार्थी, शहीद जावानांचे कुटुंबिय आदी सर्वच क्षेत्रातील या मान्यवरांचा अनोखा सन्मान यावेळी झाला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी