शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानवरुन आरोप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली मनमोहन सिंग यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 12:30 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आज सकाळी संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली.

ठळक मुद्देगुजरातमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पाकिस्तानचे माजी मंत्री आणि राजनैतिक अधिका-यांसोबत गुप्त बैठक झाली असा आरोप मोदींनी केला होता.आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे मनमोहन सिंग म्हणाले होते. 

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत परस्परांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर आज सकाळी संसदेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्परांना नमस्कार करुन हस्तांदोलन केले. तीन दिवसांपूर्वीच मोदींनी एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते आणि पाकिस्तानच्या अधिका-यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचा आरोप केला होता. 

गुजरातमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पाकिस्तानचे माजी मंत्री आणि राजनैतिक अधिका-यांसोबत गुप्त बैठक झाली. या बैठकीला मनमोहन सिंग उपस्थित होते असा आरोप केला होता. मोदींच्या या आरोपाला मनमोहन सिंग यांनी सुद्धा जोरदार प्रत्युतर दिले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने हताश नरेंद्र मोदी काँग्रेस पक्ष व त्याच्या नेत्यांविरुद्ध धादान्त खोटे आरोप करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु याने आपण पंतप्रधानांच्या उच्च पदाची अप्रतिष्ठा करीत आहोत, याचेही त्यांना भान नसावे याची कीव वाटते, असे मनमोहन सिंग म्हणाले होते. 

 

संसदेबाहेर परस्परांची भेट घेतल्यानंतर मोदी आणि मनमोहन सिंग 2001 संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आत निघून गेले. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात भाजपावर जोरदार हल्लाबोल करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा यावेळी संसेदत उपस्थित होते. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि रवी शंकर प्रसाद यांच्याशी त्यांनी चर्चा केली.  

 

आरोपांना उत्तर देताना काय म्हणाले मनमोहन सिंग डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत खरमरीत निवेदन प्रसिद्ध केले. ते म्हणतात की, अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत गुजरात निवडणुकीचा विषय कोणी काढला नाही की त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. चर्चा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांपुरतीच मर्यादित होती. त्या बैठकीला जे हजर होते त्यापैकी कोणावरही राष्ट्रद्रोहाचा आरोप केला जाऊ शकत नाही. गेल्या पाच दशकात मी सार्वजनिक जीवनात राहून देशासाठी केलेली सेवा सर्वज्ञात आहे. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदींसह कोणीही माझ्या देशसेवेविषयी दुरान्वयानेही शंका घेऊ शकत नाही, असेही डॉ. सिंग यांनी ठामपणे नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग