मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 13:18 IST2018-07-21T13:11:56+5:302018-07-21T13:18:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

PM uses Hate, Fear and Anger in the hearts of some of our people, Rahul Gandhi's criticism | मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, राहुल गांधींची टीका 

मोदी तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, राहुल गांधींची टीका 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणाला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी ठरावीक वर्गामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाचे वातावरण निर्माण करत आहेत. पण आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.




शुक्रवारी लोकसभेत सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुलगबंदी रंगली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी राफेल करारासह विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींच्या लोकसभेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. "संसदेमध्ये काल झालेल्या चर्चेचे सार काढल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला हेतू साध्य करण्यासाठी  देशातील नागरिकांच्या हृदयामध्ये तिरस्कार, भय आणि क्रोधाची भावना निर्माण करत आहेत, असे वाटते. मात्र आम्ही सर्व भारतीयांच्या मनात प्रेम आणि करुणा निर्माण करत आहोत. देशबांधणीसाठी हाच एक मार्ग आहे, असे राहुल गांधी म्हणाले.  

 

Web Title: PM uses Hate, Fear and Anger in the hearts of some of our people, Rahul Gandhi's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.