शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

'मुस्लिमांच्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार; मोदीजी देश सर्वांचा आहे हे आधी स्पष्ट करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:12 IST

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देजम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नसल्याचं स्पष्ट करावं अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे.

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील मुस्लिम आणि अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नसल्याचं स्पष्ट करावं अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार जातीय भेद निर्माण करत असल्याचा आरोपही केला.

फारुख अब्दुल्ला यांनी ‘मला वाटतं देशात दुर्घटना सुरू आहेत. आपल्या डोक्यावर युद्धाची टांगती तलवार असून अशा दुर्दैवी परिस्थितीत आपण सापडलो आहोत. आम्हाला लोकांमध्ये शांतता आणि समजूतदारपणा हवा आहे. मात्र दुर्दैवाने या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष अनेक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे’, असे म्हटले आहे.

‘मुस्लिम आणि अल्पसंख्यांक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी स्पष्ट केले पाहिजे की, देश कोणा एका पक्षाचा किंवा ठराविक लोकांचा नाही. हा देश सर्वांचाच आहे हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आपण सर्वांनी शांतता राखत एकत्र राहिले पाहिजे’, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

'मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया, असं बोलणं मोदींना शोभतं का?'फारूक अब्दुल्ला यांनी मोदींवर याआधीही टीका केली आहे. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?. पण पंतप्रधानांना हे शोभतं का, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता. फारूक अब्दुला यांनी मोदींच्या भाषणावरुन त्यांना लक्ष्य केलं. पीएम म्हणतात की माझ्या आईला शिवी दिली, माझ्या वडिलांना शिवी दिली. पण, पंतप्रधानांना हे शोभा देतं का ? मी कधीही माझ्या भाषणात आई-वडिलांचा उल्लेख करत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नेहमी उच्च विचार करायला हवा, असे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर