शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

PM मोदींची लुंबिनीला भेट; म्हणाले- नेपाळ शिवाय राम अपूर्ण, बुद्धांसोबत सांगितलं खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 5:20 PM

आज जगात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारत आणि नेपाळचे घनिष्ठ संबंध संपूर्ण मानव जातीच्या हिताचे काम करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनेपाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भगवान बुद्धांची जन्मभूमी असलेल्य लुंबिनीला भेट दिली. यावेळी मोदी म्हणाले, नेपाळशिवाय आमचे रामही अपूर्ण आहेत. आज भारतात भव्य राम मंदिर उभारले जात असतानना नेपाळमधील लोकांनाही याचा आनंद असेल. हा देश आपली संस्कृती जपणार आहे. एवढेच नाही, तर मोदी म्हणाले,  आपला सामायिक वारसा म्हणजे आपली संस्कृती आणि आपले प्रेम आहे. हे आमचे भांडवल आहे. ते जेवढे मजबूत असेल, तेवढेच आपल्याला बुद्धाचा संदेश जगापर्यंत पोहोचवता येईल.

आज जगात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भारत आणि नेपाळचे घनिष्ठ संबंध संपूर्ण मानव जातीच्या हिताचे काम करतील. यातच, भगवान बुद्धांप्रती असलेली दोन्ही देशांची आस्था आपल्याला एका धाग्याने बांधते, एका कुटुंबाचा सदस्य बनवते.

पंतप्रधान म्हणाले, बुद्ध हे बोधही आहेत आणि शोधही  आहेत.  ते विचारही आहेत आणि संस्कारही आहेत. एवढेच नाही, तर महात्मा बुद्ध यांनी केवळ उपदेशच दिला नाही, तर मानवतेला ज्ञानाची अनुभूतीही करून दिली आहे. प्राप्तीपेक्षाही अधिक महत्व त्यागाचे आहे. याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली, म्हणून महात्मा बुद्ध हे विशेष आहेत, असेही मोदी म्हणाले.

बुद्धांचे जीवन पूर्णत्वाचे प्रतिक - मोदी म्हणाले, 'बुद्धांनी सांगितले होते, की स्वतःच स्वतःचे दीपक बना. माझे विचारही विचारपूर्वक स्वीकारा.' महात्मा बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानप्राप्तीही झाली आणि यानंतर याच तिथिला त्यांचे निर्वाणही झाले. हा केवळ योगायोग नव्हता. ही मानवी जीवनाची परिपूर्णता आहे. पौर्णिमा हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. महात्मा बुद्ध हे भौगोलिक सीमांच्याही वर होते. ते सर्वांचे आहेत आणि सर्वांसाठी आहेत. भगवान बुद्धांशी माझेही विशेष नाते आहे. यात एक अद्भुत आणि सुखद योगायोग आहे.

वडनगरसोबत महात्मा बुद्धांचं नातं - मोदी म्हणाले, माझा जन्म ज्या वडनगरमध्ये झाला, ते प्राचिन काळी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र होते. तेथे आजही मोठ्या प्रमाणावर अवशेष निघत आहेत. काशीच्या जवळच असलेल्या सारनाथसोबतची माझी आत्मीयता आपल्यालाही माहीत आहे, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळ