शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

'लेटर्स टू मदर'; मोदींनी आईला लिहिलेल्या पत्रांवरील पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 8:38 PM

नरेंद्र मोदींनी तरुणपणात आईला लिहिलेल्या पत्रांवर आधारित पुस्तकाचं पुढील महिन्यात प्रकाशन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तरुणपणी आईला लिहिलेल्या पत्रांवर आधारित पुस्तक पुढील महिन्यात प्रकाशित होणार आहे. या पत्रांमध्ये मोदींनी त्यांच्या आईचा उल्लेख 'जगत जननी' असा केला आहे. मोदी तरुण असताना दररोज रात्री त्यांच्या आईला पत्र लिहायचे. त्यावर आधारलेलं 'लेटर्स टू मदर' नावाचं पुस्तक पुढील महिन्यात हार्पर कॉलिन्सकडून प्रकाशित करण्यात येईल. मोदींनी गुजराती भाषेत त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रांचं भाषांतर 'लेटर्स टू मदर'मध्ये आहे. भावना सोमय्या यांनी पत्रांचं भाषांतर केलं आहे. मोदींच्या डायरीमधून ही पत्रं घेण्यात आली आहेत. 'लेटर्स टू मदर'मध्ये वाचकांना मोदींनी १९८६ पासून आईला लिहिलेली पत्रं वाचायला मिळतील. 'हा साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. या पुस्तकातील परिच्छेद माझ्या निरीक्षणातून निर्माण झालेली प्रतिबिंबं आहेत. माझ्या भावना मी यामधून व्यक्त केल्या आहेत,' अशी भावना मोदींनी या पुस्तकाबद्दल व्यक्त केल्याचं हार्पर कॉलिन्सनं म्हटलं आहे. 'मी लेखक नाही. आपल्यातले अनेक जण लेखक नसतात. पण प्रत्येक जण भावना व्यक्त करतो. अनेकदा भावना दाटून आल्यावर कागद आणि पेन हाती घेण्याशिवाय पर्याय नसतो. केवळ लिहिण्यासाठी नाही, तर आत्मचिंतनासाठी आपण कागद पेन हाती घेतो. मग डोक्यात आणि मनात चालणाऱ्या गोष्टी कागदावर उतरतात,' असं मोदींनी या पुस्तकाविषयी म्हटलं आहे.तरुणपणी आईला पत्र लिहिताना मोदी त्यांच्या आईचा उल्लेख 'जगत जननी' असा करायचे. रात्री झोपण्यापूर्वी ते आईला पत्र लिहायचे. यामध्ये विविध विषयांना स्पर्श केलेला असायचा. अनुभवलेलं दु:ख, आनंद, आठवणी ते पत्राच्या माध्यमातून आईला सांगायचे. 'मोदींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये तरुणांमध्ये असणारा उत्साह, काहीतरी बदल करण्याची सुरुवात दिसून येते. मात्र काही महिन्यांनी ते पानं फाडून जाळायचे. त्यांच्या १९८६ मधल्या डायरीमधील काही पानं मात्र शिल्लक राहिली. ती पहिल्यांदाच इंग्रजीत वाचकांच्या भेटीला येत आहेत,' असं हार्पर कॉलिन्सनं म्हटलं आहे.लॉकडाऊनमध्ये वेगळीच खेळी; 'त्या' निर्णयामुळे भरणार मोदी सरकारची झोळीमोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी