शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची नौका बुडतेय, संघानेही सोडली साथ, मायावतींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 11:20 IST

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी बसपाप्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपाला लगावला आहे. बसपाप्रमुख मायावती आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि भाजपामध्ये उत्तर  प्रदेशात क़वी झुंज सुरू आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी बसपाप्रमुख मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वाकयुद्धही तीव्र झाले आहे. दरम्यान, आज मायावती यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. ''सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे, असे मायावतींनी म्हटले आहे.  दरम्यान, राजस्थानातील अल्वर येथे दलित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे राजकारण करीत असल्याबद्दल बसपच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधानांवर कडाडून टीका केली होती. मोदी दलितांविषयी दाखवत असलेला कळवळा व प्रेम नाटकी असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.

राजस्थानमध्ये निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण दाखवून या पीडित महिलेची तक्रार नोंदवण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना लगेच निलंबित केले. मात्र राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर मोदी यांनी प्रचारसभेत टीका केली. मायावती यांनी या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असेही पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा उल्लेख करून मायावती म्हणाल्या होत्या की, अल्वर येथील बलात्कार प्रकरणावरून मोदींनी नक्राश्रू ढाळू नयेत. दलितांविषयी खोटा कळवळा दाखवून मोदी यांच्या हाती काहीही लागणार नाही. दलितांवरील अत्याचारांबद्दल पंतप्रधानांनी मौन बाळगले होते. निवडणूक प्रचारात परिस्थिती पाहून मोदी आपली वेगवेगळी जात सांगतात, असा आरोपही मायावती यांनी केला. 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक