शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 22:49 IST

देशासाठी झटणाऱ्या मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी जनतेनं दिवसातून एकदा प्रार्थना करावी, असं आवाहन बिप्लब देब यांनी केलं.

आगरताळा: आपल्या अजब विधानांनी कायम चर्चेत राहणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आता एक नवा शोध लावला आहे. विशेष म्हणजे देब यांनी लावलेला नवा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. मोदींचे एक भाऊ रिक्षा चालवतात, तर दुसऱ्या भावाचं किराणा मालाचं दुकान आहे, असा दावा देब यांनी केला आहे. सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आगरताळामध्ये पराक्रम पर्व नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उपस्थितांनी संवाद साधताना बिप्लब कुमार देब यांनी मोदी आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला. मोदींच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलताना देब यांनी बरीच 'नवी' माहिती दिली. 'मोदीचं कुटुंब अतिशय साधेपणानं राहतं. त्यांचा एक तर आजही भाऊ रिक्षा चालवतो,' असं देब म्हणाले. मोदी गेल्या 4 वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्याआधी 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र आजही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आधीसारखीच आहे, अशी स्तुतीसुमनं देब यांनी उधळली. 'मोदींची आई अतिशय वृद्ध आहे. मात्र त्या आजही एका 10 बाय 12 च्या खोलीत राहतात. त्या मोदींसोबत पंतप्रधान निवासात राहात नाहीत. मोदींचे एक भाऊ रिक्षा चालवतात. तर दुसरे भाऊ किराणा मालाचं दुकान सांभाळतात. तुम्ही असा पंतप्रधान कधी पाहिलाय का?', असं देब यांनी म्हटलं. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब त्यांच्या अजब विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत. महाभारत काळात इंटरनेट होतं, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. 'प्रत्यक्ष युद्धभूमीवर नसूनही संजयनं महाभारतात युद्धभूमीवरील घडामोडी धृतराष्ट्रांना सांगितल्या होत्या. याचा अर्थ त्यावेळीदेखील इंटरनेट, उपग्रह यासारख्या गोष्टी होत्या. त्यावेळीदेखील तंत्रज्ञान अस्तित्वात होतं,' असं विधान देब यांनी केलं होतं. 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवNarendra Modiनरेंद्र मोदी