शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 11:28 IST

Narendra Modi : हे पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना लिहिले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर निवडणूक प्रचाराची ३० मे म्हणजेच आज ही शेवटची तारीख आहे. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. सातव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५७ जागांवर मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीवाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना (फर्स्ट टाईम वोटर्स) पत्र लिहिलं आहे. दरम्यान, हे पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांना लिहिले आहे.

१ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना पत्राद्वारे केले आहे. भाजपाचे कार्यकर्ते वाराणसी लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्र मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान, वाराणसी लोकसभा जागेवर पहिल्यांदाच मतदान करणारे ३१,५३८ मतदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना लिहिलेल्या पत्रात, "भारताचे पंतप्रधान आणि तुमचे खासदार म्हणून तुमचे अभिनंदन. आज मी तुम्हाला पूर्ण अभिमानाने आणि आत्मविश्वासाने हे पत्र लिहित आहे."

पुढे नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, "तुम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच तुमचा मताधिकार वापरणार आहात. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची ही संधी म्हणजे राष्ट्र उभारणीत तुमचा सहभाग पाहण्याचा विशेषाधिकार आहे. लोकशाही हा केवळ शासनाचा एक प्रकार नाही तर आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ देखील आहे. वाराणसीने गेल्या २० वर्षात विकासाच्या नवीन शिखरांना कसे स्पर्श केले याचे तुम्ही साक्षीदार आहात." दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला जात आहेत. याठिकाणी ते विवेकानंद रॉक येथे ४५ तास ध्यानधारणा करणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Varanasiवाराणसी