शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी द्वेष पसरवून भारताला कमजोर केले; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 06:43 IST

तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेष पसरविल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व संतापाच्या वातावरणाचा फायदा चीन, पाकिस्तान व भारताच्या शत्रूंना होणार आहे. काँग्रेसच्या महागाईवरील हल्लाबोल रॅलीमध्ये ते म्हणाले, आता विरोधकांकडे जनतेत जाण्याशिवाय व थेट संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळेच काँग्रेस ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे.तीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी होते. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले व मोदींना ताकद दाखवून दिली. देशात अशी स्थिती आहे की, इच्छा असूनही युवकांना रोजगार मिळू शकत नाहीत. मीडिया, प्रेस, न्यायपालिका, निवडणूक आयोग यावर सरकारचा दबाव आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा महत्त्वपूर्ण आहे. 

ईडीला घाबरणार नाही’आम्ही ईडीला घाबरणारे नाहीत. ज्याला भीती वाटते, तो द्वेष निर्माण करतो. ज्याला भीती नाही, तो द्वेष पसरवत नाही. विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांच्या मागे ईडी व सीबीआय लावली. मी ईडीला घाबरत नाही. तुम्ही ५५ तास ठेवा, १०० तास ठेवा, २०० तास ठेवा, पाच वर्षे ठेवा, मला काहीही फरक पडत नाही. आमचे संविधान देशाचा आत्मा आहे. ते वाचविण्याचे काम प्रत्येक देशवासीयाला करावे लागेल. आम्ही हे काम केले नाही तर हा देश वाचणार नाही.  - राहुल गांधी, काँग्रेस नेते

गांधी कुटुंबाची विश्वसनीयता जास्त’-  काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी रॅलीला संबोधित केले. भाजपच्या लोकांनी लोकशाहीचा मुखवटा धारण केलेला आहे. -  गांधी कुटुंबाची विश्वसनीयता पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.-  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यावेळी म्हणाले की, महागाई आणि बेरोजगारी रोखण्यावर नव्हे, तर केंद्र सरकारचे लक्ष राहुल गांधी यांना कसे रोखले जाईल, यावर आहे. -  काँग्रेसच्या महागाईच्या विरोधातील रॅलीमध्ये प्रचंड संख्येने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर व पोस्टरद्वारे केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा