मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 07:10 AM2022-10-27T07:10:27+5:302022-10-27T07:11:27+5:30

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतीलप्रशासन (एलबी एसएनएए) फाऊन्डेशन कोर्सला उपस्थित राहणाऱ्या ४०० जणांना ते संबोधित करतील.

PM Narendra Modi visits Gujarat three times in one month; After Uttar Pradesh, the home state has the highest number of visits! | मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी!

मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी!

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान पुन्हा गुजरातचा दौरा करणार असून या महिन्यात गृहराज्याला दिलेली ही त्यांची तिसरी भेट ठरेल. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतीलप्रशासन (एलबी एसएनएए) फाऊन्डेशन कोर्सला उपस्थित राहणाऱ्या ४०० जणांना ते संबोधित करतील. केवडिया येथील नर्मदा नदीच्या तीरावरील 'स्टॅच्यू ऑफ जाईल. युनिटी' या स्थळावरच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

'आरंभ' च्या चौथ्या आवृत्तीची औपचारिक सुरुवात त्यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी नवे आयएएस अधिकारी आणि संलग्न सेवेत सहभागी नव्या कर्मचाऱ्यांसमोर पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती पटवून देतील. वल्लभभाई पटेल यांनी ५६२ संस्थानांचे देशात विलीनीकरण केले होते, याचे स्मरण यानिमित्ताने केले जाईल.

यापूर्वी मोदींनी १९-२० ऑक्टोबर रोजी डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन करतानाच हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. मे २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान बनल्यापासून मोदींनी गेल्या तीन वर्षात २२ वेळा गुजरातला भेटी दिल्या आहेत. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी अहमदाबाद येथे ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन केले होते. ९-११ ऑक्टोबर आणि १९-२२ ऑक्टोबर अशा दोन भेटी त्यांनी याच महिन्यात दिल्या आहेत. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक भेटी गुजरातला दिल्या आहेत.

निवडणुकीवर डोळा....
निवडणूक आयोगाकडून गुजरातमध्ये कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवण्याच्या उद्देशानेच मोदींनी दौरे चालविल्याचे दिसते. मोदींनी काही भेटींमध्ये रोड शो करीत जनसंपर्कावर भर दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातला अनेक भेटी दिल्या आहेत. प्रचारयंत्रणेतील कमकुवतपणा दूर करण्यासाठी त्यांनी एकाच महिन्यात चारदा गुजरातला भेटी दिल्या आहेत, हे विशेष.

Web Title: PM Narendra Modi visits Gujarat three times in one month; After Uttar Pradesh, the home state has the highest number of visits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.