शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"लोकसभेत एक, राज्यसभेत एक... ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 17:33 IST

PM Narendra Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तसेच काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावर भूमिका मांडली आहे. याच दरम्यान त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही असं म्हणत मोदींनी हल्लाबोल केला आहे. "एवढी वर्षं देशावर राज्य केलेली पार्टी... पण लोकसभेत एक, राज्यसभेत एक. ही अशी विभागलेली, कन्फ्यूज काँग्रेस देशाचं भलं करू शकत नाही'' असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

माझ्या भाषणाने काँग्रेस उघडी पडेल अशी भीती असल्याचं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काँग्रेसची लोकसभेत एक भूमिका, तर राज्यसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि कन्फ्यूज पार्टी मी कधी पाहिली नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला. तसेच कोरोनावरही भाष्य केलं आहे. कोरोना प्रकोपात जग हलले, परंतू आम्ही वाचलो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मनीष तिवारी म्हणाले होते. 

देवाच्या कृपेने आम्ही कोरोनापासून वाचलो; नरेंद्र मोदींचे 'आश्चर्यकारक' वक्तव्य

मी म्हणतो डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला असे मोदी यांनी सांगितले. परदेशांमध्ये लाखो-करोडो डॉलर तिजोरीत पडून होते. त्यांना त्यांचे नागरिक वाचविता आले नाहीत. पण आपण आत्मनिर्भर झालो, असे मोदी म्हणाले. आधारविरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. मी आज यावर बोलणार आहे. आधारमुळे आज कोरोनाकाळात आम्ही जनधन, शेतकरी, पदपथवाले अशा अनेकांच्या खात्यात मदत पोहोचवली. आज आपल्याकडे विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. ट्रॅक्टर, गाड्यांचा विक्रमी सेल झाला आहे. तीन कृषी कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस