शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दूध आणि मर्सिडीजला एकच कर लावू शकत नाही; जीएसटीवरील टीकेला मोदींचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 16:15 IST

जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मोदींची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : जीएसटीची वर्षपूर्ती हे सहकारी संघवादाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. अनेक देशांमध्ये एकाच दरानं जीएसटी आकारला जातो. मग मोदी सरकारनं 6 टप्प्यांमध्ये जीएसटी का लागू केला?, असा सवाल विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला आहे. या टीकेली मोदींनी उत्तर दिलं. 'एकाच टप्प्यात जीएसटी लागू करावा, हे बोलणं सोपं आहे. पण मग आपण कोणत्याही खाद्यपदार्थावर शून्य जीएसटी लागू करु शकत नाही. दूध आणि मर्सिडीजवर समान कर लागू करु शकतो का?' असा प्रश्न मोदींनी स्वराज्य या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला. जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. 'जीएसटीचा दर एकच असावा, असं आमचे काँग्रेसमधले मित्र म्हणतात. खाद्यपदार्थ आणि वस्तूंवर समान कर असावा, असंही ते सांगतील का? सध्या ज्या खाद्यपदार्थांवर शून्य, 5 किंवा 18 टक्के इतका कर लागतो, त्यांच्यावर वस्तूंइतका कर लावावा, असं काँग्रेसमधील माझे मित्र म्हणतील का?,' असे सवाल उपस्थित करत मोदींनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. जीएसटीमुळे झालेल्या फायद्यांची आकडेवारीही यावेळी मोदींनी सांगितली. 'जीएसटीमुळे देशाला झालेला आर्थिक लाभ मी आकडेवारीच्या मदतीनं सांगू इच्छितो. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 66 लाख कार्यालयांची नोंदणी झाली होती. मात्र जीएसटी लागू होताच वर्षभराच्या कालावधीतच 48 लाख नव्या कार्यालयांची नोंद झाली. या काळात 350 कोटी इनव्हॉईसवर प्रक्रिया झाली. याशिवाय 11 कोटी लोकांनी कर भरला. जीएसटी अतिशय गुंतागुंतीचा आहे, अशी टीका करण्याआधी ही आकडेवारी आपण लक्षात घ्यायला नको का?,' असा प्रश्न यावेळी मोदींनी उपस्थित केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGSTजीएसटीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी