शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात भाजपाची लाट नाही, तर वादळ- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 13:14 IST

मोदींचा राहुल गांधी आणि काँग्रेस सरकारवर हल्लाबोल

म्हैसूर: कर्नाटकमध्ये भाजपची लाट नाही, तर वादळ आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा केला. कर्नाटक काँग्रेस सरकार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना यावेळी मोदींनी लक्ष्य केलं. राहुल गांधी कर्नाटक सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलले, तरी खूप झालं, असं म्हणत मोदींनी त्यांना काँग्रेस सरकारच्या कामाबद्दल 15 मिनिटं बोलण्याचं आव्हान दिलं. 'तुम्ही नामदार आहात. आम्ही कामदार आहोत,' असा टोलादेखील मोदींनी राहुल यांना लगावला. ते म्हैसूरमध्ये बोलत होते. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच मोदींना थेट आव्हान दिलं होतं. मोदी त्यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकसभेत 15 मिनिटंदेखील बोलू शकणार नाहीत, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांच्या या आव्हानाला मोदींनी प्रतिआव्हान दिलंय. राहुल गांधीनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल 15 मिनिटं बोलून दाखवावं असं आव्हान मोदींनी दिलं. 'तुमच्या सरकारनं केलेल्या कामांबद्दल बोलून दाखवा. कोणताही कागद न पाहता राहुल यांनी हिंदी, इंग्रजी किंवा त्यांच्या मातृभाषेत बोलावं,' असं मोदी म्हणाले. भाजप सरकारच्या काळात देशाच्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. '2005 मध्ये मनमोहन सिंग यांनी 2009 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचेल, असं म्हटलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं? काँग्रेसनं डॉ. मनमोहन सिंग यांना कशी वागणूक दिली, हे आपण पाहिलंय. मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी फाडला होता,' याची आठवणही मोदींनी यावेळी करून दिली. जिथे लोकायुक्तच सुरक्षित नसतील, तिथे सामान्य लोक किती सुरक्षित असतील?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही भाष्य केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस