शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 15:17 IST

पंतप्रधान मोदींकडून प्रचारात पुन्हा कलम ३७० चा मुद्दा उपस्थित

इलेनाबाद: जम्मू काश्मीरमध्ये काय होणार, कोणत्या दिवशी काय घडणार, हे आधी फुटिरतावादी, दहशतवादी आणि बाजूच्या देशातली काही माणसं ठरवायची. मात्र आता सर्व काही आपण ठरवतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० चा विषय काश्मीरसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. पंतप्रधान पदाची खुर्ची येत जात राहते. मात्र काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. ते हरयाणातील प्रचारसभेत बोलत होते. हरयाणाची निवडणूकदेखील महाराष्ट्रासोबत आहे.आधीच्या सरकारच्या काळात काश्मीरमध्ये कधी काय घडणार, याचं कॅलेंडर दहशतवादी ठरवायचे. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी काय होणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कोणत्या घडामोडी घडणार, याचं संपूर्ण कॅलेंडर फुटिरतावादी, दहशतवाद्यांकडे असायचं. त्यांच्याकडून सर्व तारखा निश्चित केल्या जायच्या. मात्र आता ते तारखा ठरवत नाहीत. तर आपण ठरवतो. आपली धोरणं आपण ठरवतो. आता ते आपलं भाग्य ठरवणार नाहीत. कारण देश बदलला आहे, अशा शब्दांत मोदींनी प्रचारात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला. आधी शेजारच्या देशातून आलेल्या इशाऱ्यांवर काश्मीरमध्ये घडामोडी व्हायच्या. तिथून सूत्रं हलली की काश्मीरमध्ये खेळ सुरू व्हायचा. आपले जवान शहीद व्हायचे. तिरंग्याला आग लावली जायची. तो पायदळी तुडवला जायचा. कारण काश्मीरमधील दोन कुटुंबाना मनमानी करायला दिली की तिथली परिस्थिती नियंत्रणात राहील, असं दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाटायचं. दोन कुटुंबांनी काश्मीरला लुटलं तरी चालेल, अशी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. मात्र काश्मीर असं धगधगतं ठेवता येणार नाही. पंतप्रधानपद येत जात राहील. पण काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370