शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

कैलाश खेर यांनी गायलं 'मनमोहक मोर निराला', पंतप्रधान मोदांनी शेअर केलं गाणं; 'ही' आहे गाण्याची 'खासियत'

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 25, 2020 8:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे. कैलाश खेर यांनी गायलेल्या या गाण्यात, पंतप्रधान मोदींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो जोडले आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे.पंतप्रधा मोदींनी शेअर केलेले हे गाणे एकूण 3.52 मिनिटांचे आहे.या गाण्यात, पंतप्रधान मोदींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो जोडण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले आहे. या गाण्यात त्यांचे काही जुने फोटोही जोडण्यात आले आहेत. हे गाणे बॉलीवुड गायक कैलाश खेर यांनी गायले आहे. गाण्याचे बोल आहेत, 'मनमोहक मोर निराला'. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गाणे शेअर केले आहे. कैलाश खेर यांनी गायलेल्या या गाण्यात, पंतप्रधान मोदींच्या लहानपणापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो जोडण्यात आले आहेत.

पंतप्रधा मोदींनी शेअर केलेले हे गाणे एकूण 3.52 मिनिटांचे आहे. या गाण्यात वापरण्यात आलेल्या फोटोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या जिवनाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कैलाश खेर यांनी जेवढ्या सुंदर अंदाजात हे गाणे गायले आहे, तेवढ्याच सुंदर अंदाजात या गाण्यात मोदींचे फोटोही जोडण्यात आले आहेत. 

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती -यापूर्वी भारतीय जनसंघाचे जनक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, कोरोना काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली आहे. एवढेच नाही, तर अनेकांना कोरोनाची लागणही झाली आणि काही कार्यकर्त्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

कृषी विधेयकावरून विरोधकांवर निशाणा -आपल्या संबोधना पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांत आपल्या सरकारने तरुण व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या नावे अनेक घोषणा करण्यात आल्या. पण त्यांच्या घोषणा पोकळ राहिल्या. कृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्‍यांना होईल.आता शेतकर्‍याची इच्छा आहे की, ते कोठेही धान्य विकू शकतील. जेथे शेतमालाला जास्त भाव मिळेल तेथे ते विकतील. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले, ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत. हे लोक खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट

याचबरोबर, काही लोकांनी राष्ट्रहिताऐवजी स्वतःचे हित सर्वोच्च ठेवले आहे. शेतकर्‍यांना कायद्यात अडकवून ठेवले होते. यामुळे त्यांचे धान्य कोठेही विक्री करता आले नाही. आम्ही MSP मध्ये रेकॉर्ड वाढविला. आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाKailash Kherकैलाश खेर