शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 18:05 IST

Women Reservation Bill: "मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले."

राजस्थानातील जयपूर येथे महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला होता. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नाईलाजाने महिला आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागला. यापूर्वी देशात कुणीही महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात विचारही केला नव्हता, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यांच्या याच विधानाला आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते  पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य" - पवार म्हणाले, "1993 साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्रं होती. देशात1993 मध्ये महाराष्ट्रात राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना जून 1993 मध्ये महाराष्ट्रात महिला आणि बालविकास हा स्वतंत्र विभाग सुरू केला. देशात असा विभाग कुठेही नव्हता. 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटना दुरुस्ती झाली. याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यात देशभरात पंचायत व्यवस्था लागू झाली. घटनेचे कलम 243 ड हे समाविष्ट केले आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक तृतियांश आरक्षण देण्याची तरतूद केली. त्याच वर्षी नगर पालिका, पंचायती, महापालिका यात घटनादुरुस्तीचा कायदा पास झाला. आणि शहरी भागात महिलांसाठी आरक्षण लागू झाले."

मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही -"मला आठवते की, केआर नारायणन हे देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांच्या उपस्थित नेहरू सेंटरला या धोरणाचा विषय महिला संघटनेला सांगण्यासाठी एक संमेलन आयोजित केले होते. 22 जून 1994 ला महाराष्ट्राने देशात पहिले महिला धोरण जाहीर केले. या धोरणातूनच महाराष्ट्रात सरकारी, निमसरकारी विभागतील महिलांसाठी तीस टक्के आरक्षण ठेवण्यात आले आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते 33 टक्के करण्यात आले. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले.

...तेव्हा पहिल्यांदा आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये 11 टक्के जागा महिलांसाठी ठेवल्या-"माझ्याकडे देशाचे संरक्षण खाते होते. तेव्हा तेथे पहिल्यांदा आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये 11 टक्के जागा महिलांसाठी ठेवल्या. हल्ली, प्रजासत्ताकाची परेड दिल्लीतील महत्वाच्या रस्त्यावर होते, त्या परेडचे नेतृत्व एक भगिनी करते. हे आपण बघतो. या देशात एअरफोर्समध्ये महिलांना सहभागी करून घेतले आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानWomen Reservationमहिला आरक्षण