शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

देशाला राफेलची कमी जाणवली; लोक विचारतायत, राफेल असती तर काय झालं असतं ?- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 7:02 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी विरोधाच्या नादात देशहिताच्या विरोधात मतप्रदर्शन करू नका, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. राफेल वादाचा उल्लेख करत ते म्हणाले, राफेलवरील स्वार्थी राजकारणापायी देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवते आहे.राफेल विमानं असती तर पाकिस्तानचं काय झालं असतं, असा प्रश्न आता जनता मला विचारत आहे. मला जरूर विरोध करा, पण मोदी विरोधाचा फायदा मसूद अझहर आणि हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना होऊ देऊ नका. आज पूर्ण देश लष्कराबरोबर खांद्याला खांदा लावून उभा असतानाच विरोधक लष्कराच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करत आहेत. अशा लोकांना मी विचारू इच्छितो की, तुम्हाला लष्कराच्या सामर्थ्यावर शंका आहे की विश्वास आहे. मोदी विरोध नक्कीच करा, आमच्या योजनांमध्ये त्रुटी काढल्यास आम्ही तुमचं स्वागतच करू. परंतु देशाच्या सुरक्षेसंबंधी बाबी आणि देशहिताला विरोध करू नका. मोदी विरोधाचा मसूद अझहर आणि हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना फायदा होणार नाही, हे विरोधकांनी सुनिश्चित करावं.अख्खं जग दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताच्या पाठीमागे आहे. पण देशातील काही लोक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान म्हणाले, 2014-19पर्यंत देशाच्या गरजा पूर्ण करण्याची वेळी होती. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले आहेत. पाच वर्षांत मेहनत आणि परिश्रमानं आम्ही देशाचा पाया मजबूत केला आहे. या रचलेल्या पायावरच भारताच्या भव्य इमारतीचं निर्माण होणार आहे. नव्या भारतासाठी देशातील एका-एका वीर जवानांचं रक्त अनमोल आहे. आता कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकणार नाही. आज भारत निडर आणि निर्णायक आहे. सव्वाशे कोटी जनतेच्या प्रयत्नांमुळेच देश प्रगतिपथावर आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील