शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मला गुजरातचा दक्षिण कोरिया करायचा होता- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 16:11 IST

उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटमध्ये मोदींचं भाषण

देहरादून: मला गुजरातचादक्षिण कोरिया करायचा होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटमध्ये बोलताना म्हटलं. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हा तुम्हाला गुजरातचं काय करायचं आहे, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला मी दक्षिण कोरिया असं उत्तर दिलं होतं. कारण दक्षिण कोरिया आणि गुजरातची लोकसंख्या समान आहे. दोन्ही देशांना समुद्र किनारा लाभला आहे, असं मोदी म्हणाले. एक दिवसाच्या देहरादून दौऱ्यावर असलेल्या मोदींनी उत्तराखंड इन्वेस्टर्स समीटचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी विविध देशांमधून समीटमध्ये सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना संबोधित केलं. 'देशात परिवर्तन सुरू असताना आज अनेक गुंतवणूकदार उत्तराखंडमध्ये उपस्थित आहेत. सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे. महागाई स्थिर आहे. मध्यमवर्गाचा विकास अतिशय वेगानं सुरू आहे,' असं मोदींनी म्हटलं. भारताचा आर्थिक विकास अतिशय वेगानं होत आहे, असा दावा पंतप्रधानांनी केला. 'आम्ही 14 हजाराहून अधिक कायदे रद्द केले आहेत. देशाच्या कर व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवले आहेत. करप्रणाली सुधारणा करुन ती अधिक पारदर्शक केली आहे. बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम केली आहे. जीएसटीची अंमलबजावणी करुन आम्ही कर रचनेत मोठा बदल केला आहे,' असं म्हणत भारत हा आता गुंतवणुकीसाठी अधिक अनुकूल झाल्याचं मोदींनी सांगितलं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते. ही समीट दोन दिवस सुरू राहणार आहे. उद्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या समीटचा समारोप होईल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSouth Koreaदक्षिण कोरियाGujaratगुजरातBJPभाजपा