शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

1988 मध्ये ई-मेल, डिजिटल कॅमेऱ्याचा वापर; जाणून घ्या मोदींच्या दाव्यात किती तथ्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:13 IST

देशात इंटरनेट, डिजिटल कॅमेरा कधी आला याची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइंटरनेट आणि ई-मेलबद्दल केलेल्या दाव्यांनंतर आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. 1988 मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलचा वापर केल्याचा दावा मोदींनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मोदींचा हा दावा कितपत खरा यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. देशात इंटरनेट सेवा केव्हा सुरू झाली, डिजिटल कॅमेरा केव्हा उपलब्ध झाला, याबद्दल अनेकजण इंटरनेटवर सर्च करत आहेत. जगातला पहिला मेल 1971 मध्ये अमेरिकेतल्या केम्ब्रिजमध्ये राहणाऱ्या रे टॉमलिंसन नावाच्या व्यक्तीनं पाठवला. टॉमलिंसन यांच्या घरातल्या एकाच खोलीत दोन कॉम्प्युटर होते. त्यांनी एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये मेल पाठवला. हे दोन्ही कॉम्प्युटर नेटवर्क अर्पानेटनं (Advanced Research Projects Agency Network) जोडले गेले होते. ही इंटरनेटची सुरुवात होती. आधुनिक इंटरनेट सेवेचा जन्म 1983 मध्ये झाला. भारतात इंटरनेट सेवा 1995 मध्ये सुरू झाली. विदेश संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून ही सेवा दिली जात होती. 1988 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केल्याचं मोदी मुलाखतीत म्हणाले. 'मी बहुधा 1988 मध्ये पहिल्यांदा डिजिटल कॅमेरा वापरला,' असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं. कोडॅकमध्ये इंजिनीयर असेलल्या स्टिव्हन सॅसन यांनी 1975 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लावला. व्यावसायिक तत्त्वावरील पहिला कॅमेरा अमेरिकेत 1988 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर तो भारतात आला. कॅमेरा आणि फोटोग्राफी क्षेत्रातली त्यावेळची आघाडीची कंपनी कोडॅककडे डिजिटल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान होतं. मात्र डिजिटल कॅमेरा बाजारात आणल्यास फोटोग्राफीसाठी वापरले जाणाऱ्या रोल्सच्या विक्रीवर परिणाम होईल, असा विचार करून कंपनीनं डिजिटल कॅमेरा बाजारात आणला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternetइंटरनेट