शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चौकीदार चोर नहीं चौकन्ना है; नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 14:55 IST

चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

ठळक मुद्देचौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. 'काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत?'दहा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एका मंचावर आले होते.

पटना : चौकीदार चौर नहीं चौकन्ना है, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.

'सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण फक्त 'देशाचा चौकीदार' चोर आहे,' अशी बोचरी टीका अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी केली होती. यावर नरेंद्र मोदी यांनी चौकीदार चोर नही चौकन्ना है, देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.

याचबरोबर, गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात पुरावे मागणाऱ्यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचं खच्चीकरण कशासाठी करत आहेत? ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधाने त्यांच्याकडून का केली जात आहेत? असा सवाल करत नरेंद्र मोदींनी विरोधक सैन्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच,  आता भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसत नाही, तर ‘चुन चुन के बदला लेता हैं’ असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या या सभेला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मोठे नेते उपस्थित होते. दहा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार निवडणुकीच्या प्रचारासाठी एका मंचावर आले होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळली.

एनडीएतून नीतीश कुमार 2013 मध्ये बाहेर पडले होते...2014च्या  लोकसभा निवडणुकांच्या आधी जून 2013 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. त्यानंतर बिहारमध्ये त्यांचा पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. याशिवाय, नितीश कुमार यांनी 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत युती केली होती. त्यानंतर 2017 मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन त्यांनी आरजेडीसोबतची युती तोडली. त्यानंतर ते पुन्हा एनडीएमध्ये परतले.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार