शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

पंतप्रधान जयपूरला पोहोचण्यापूर्वीच अशोक गेहलोत नाराज, उत्तरात काय म्हणाले मोदी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:42 IST

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक असे ट्विट केले होते. ज्याला थेट पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रिप्लाय देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानात राजकीय तयारीला सुरुवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वीच येथे राजकारणही सुरू झाले आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक असे ट्विट केले होते. ज्याला थेट पीएमओच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत रिप्लाय देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विट करत म्हटले होते, पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून त्यांचे 3 मिनिटांचे संबोधन हटविण्यात आले आहे. यामुळे ते भाषणाच्या माध्यमाने पंतप्रधानांचे स्वागत करू शकणार नाहीत. याला थेट पीएमओ कार्यालयाकून उत्तर मिळाले आहे. पीएमओने ट्विट करत उत्तर दिले आहे की, आपल्याला बोलावण्यात आले आहे, आपले अजूनही स्वागत आहे.

असे आहे प्रकरण - अशोक गेहलोत यांनी ट्विट केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज आपण राजस्थानात येत आहात. PMO ने कार्यक्रमातून माझे 3 मिनिटांचे भाषण हटवले आहे. यामुळे मी भाषणाच्या माध्यमाने आपले स्वागत करू शकणार नाही. यामुळे मी या ट्विटच्या माध्यमाने आपले राजस्थानात मनापासून स्वागत करतो. यावर पीएमओकरून ट्विट करण्यात आले आहे. 

बोलावले होते, आपले स्वागत आहे -गेहलोतांच्या ट्विटवर पीएमओने ट्विट करत म्हटले आहे, "प्रोटोकॉलअंतर्गत आम्ही आपल्याला निमंत्रण पाठवले होते आणि आपल्या भाषणासाठी वेळही देण्यात आला होता. मात्र आपल्या कार्यालयाने सांगितले की, आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यापूर्वी झालेल्या दौऱ्यावेळीही आपल्याला नेहमीच बोलावण्यात आले आहे. आपण त्या सर्वच कार्यकमांना आला आहात. 

आपले स्वागत आहे -आजही आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपले स्वागत आहे. आपले  नाव सर्वांनाच माहीत आहे. विकास कामांच्या फलकावरही आपले नाव आहे. जर कुठल्याही प्रकारची शारीरिक अडचण नसेल, तर आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानTwitterट्विटरPoliticsराजकारण