शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:06 IST

दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.

नवी दिल्ली : दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी (दि.२०)  पार पडला. यावेळी, रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक वरिष्ठ भाजप नेते आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. 

दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

एनडीएच्या बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेतृत्व तसेच विविध एनडीए राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश होता. यासोबतच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत सरकारची धोरणे, धोरणात्मक समन्वय आणि एनडीए शासित राज्यांमधील आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए एकजूट आहे. आपण सर्वजण विकसित भारतासाठी एकत्र काम करू आणि येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही एकजुटीने आणि दृढतेने लढू, असे एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर या बैठकीत एनडीए नेत्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणे एनडीए प्रत्येक निवडणुकीत विजयी होईल.

पुढील निवडणुका कधी आणि कुठे होतील?२०२५ च्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२६ मध्ये आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानंतर २०२७ मध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा