शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपलेली जुनी वाहने सक्तीने काढणार भंगारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:07 IST

राष्ट्रीय वाहन भंगार धोरणाची केली घोषणा

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण’ जाहीर केले. वैयक्तिक कारसाठी २०२४ पासून, तर ट्रकसारख्या अवजड वाहनांसाठी २०२३ पासून हे धोरण लागू होणार असून, या धोरणानुसार, विहित मुदतीनंतर तपासणीत अपात्र ठरलेली वाहने थेट भंगारात टाकली जातील. गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुंतवणूक शिखर परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाले. त्याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. मोदी यांनी सांगितले की, नव्या धोरणामुळे भंगार क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल. तसेच ३५ हजार नवीन रोजगार निर्माण होतील. रस्त्यावरील जुनाट वाहने वैज्ञानिक पद्धतीने दूर होऊन अत्याधुनिक वाहनांचा मार्ग मोकळा होईल. ‘वेस्ट-टू-वेल्थ’ कार्यक्रमास या धोरणामुळे गती मिळेल. या धोरणामुळे देशातील चक्राकार अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल तसेच आर्थिक विकास प्रक्रिया अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत मिळेल.मोदी यांनी सांगितले की, या धोरणामुळे भारत धातूच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. गेल्या वर्षी आपण २३ हजार कोटी रुपयांचे भंगार पोलाद आयात केले होते. त्याची आता गरज पडणार नाही. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथील जहाज रिसायकलिंग हबला वाहन रिसायकलिंगमध्ये परिवर्तित करण्याची आमची योजना आहे.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. गुजरात आणि आसाम येथे भंगार प्रक्रिया पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सात सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, देशातील एक कोटी वाहने तत्काळ रिसायकल केली जाऊ शकतात. त्यातील चार लाख वाहने गुजरातमधील आहेत.ही वाहने जातील भंगारात१५ वर्षांपेक्षा जास्त जुनी व्यावसायिक वाहने तसेच २० वर्षांपेक्षा जास्ती जुनी वैयक्तिक वाहने तपासणीत अपात्र ठरल्यास भंगारात टाकली जातील.एप्रिल २०२३पासून अवजड व्यावसायिक वाहनांची, तर जून २०२४ पासून इतर वाहनांची सक्तीची तपासणी केली जाईल. सरकारी मालकीच्या संस्थांच्या वाहनांसाठी एप्रिल २०२२ पासूनच तपासणी सक्तीची केली जाईल.व्हिंटेज कार्सना या धोरणातून वगळण्यात आले आहे. वाहन भंगारात टाकले गेल्यास त्याचे प्रमाणपत्र वाहनधारकास मिळेल. त्याआधारे त्यास रोड टॅक्समध्ये २५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल, नोंदणी शुल्क माफ केले जाईल तसेच वाहन उत्पादकांकडून ५ टक्के स्वतंत्र सूट मिळेल. त्यांना जीएसटीत सवलत देण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadkariनितीन गडकरी