शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

आंदोलनाची भीती; मोदींच्या कार्यक्रमात काळे कपडे घालून आलेल्यांना नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 14:11 IST

अनेकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारला

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राजस्थान सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जयपूरमध्ये संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोदी जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. यासाठी  तब्बल सव्वा दोन लाख लाभार्थी जयपूरमध्ये आले आहेत. मात्र काळी पँट, काळी ओढणी, काळा रुमाल, काळी टोपी घालून आलेल्यांना कार्यक्रमात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमस्थळी आलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोदींच्या कार्यक्रमासाठी कोणी काळा शर्ट, काळे मोजे, काळी पँट घालून आलं आहे. याशिवाय अनेक महिलांकडे काळ्या रंगाची ओढणी आहे. कार्यक्रमस्थळाच्या प्रवेशद्वारावर अनेकांचे काळे कपडे काढून घेतले जात आहेत. बुरखा परिधान करुन आलेल्या मुस्लिम महिलांना कार्यक्रम स्थळावरुन परतावं लागत आहे. या कार्यक्रमासाठी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था असून अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावण्यात आले आहेत. या मेटल डिटेक्टर्सजवळ काळ्या कपड्यांचा ढिग जमा झाला आहे. अनेकजण शनिवारी काळे कपडे परिधान करतात. अशा लोकांना सरकारच्या या अजब नियमाचा फटका बसला आहे. राज्य सरकारनं याबद्दलच्या जाहिराती देताना, त्यामध्ये 'काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमाला येऊ नका', अशी सूचना द्यायला हवी होती अशा शब्दांमध्ये अनेकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी काहीजण 300 ते 400 किलोमीटर प्रवास करुन आले आहेत. त्यांनादेखील या अजब नियमाचा फटका बसतो आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthanराजस्थान