शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:50 IST

जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

मुंबई - इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. इराणच्या बाजूने चीन, रशिया आणि पाकिस्ताननेही भूमिका घेतली आहे तर अमेरिका उघडपणे इस्त्रायलच्या बाजूने उभी राहिली आहे. या दोन्ही देशाच्या संघर्षात भारताने कोणाचीही बाजू न घेता शांततेची भूमिका मांडली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी चूक करतायेत असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी इराण-इस्त्रायल युद्धात भारताच्या भूमिकेवरून टीका केली आहे.

आमदार अबू आझमी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे आणि लवकरात लवकर इस्त्रायलने ते खाली करायला हवे असं म्हटले होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह जितके पंतप्रधान झाले त्यांनीही पॅलेस्टाईनचं समर्थन केले आणि इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली होती. आज १४९ देश पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत. तिथे जे अत्याचार होतायेत त्याचा निषेध झाला पाहिजे. पॅलेस्टाईन स्वातंत्र्य झाले पाहिजे अशी मागणी करत आहेत. जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणुनबुजून हे काम करत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही. आपल्या जुन्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांविरोधात, आपल्या परराष्ट्र धोरणाविरोधात मोदी काम करत आहेत. हे ठीक नाही असंही आमदार अबू आझमी यांनी सांगितले. सध्या इराण-इस्त्रायल या दोन्ही देशात संघर्ष सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला धमकी दिली आहे. जर यूएस सैन्य तळांवर हल्ले झाले तर अमेरिका मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.

औवेसी यांनी केंद्र सरकारकडे केली मागणी

मध्य पूर्वेत इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षात औवेसी यांनी इराणमध्ये १५९५ भारतीय विद्यार्थी अडकल्याचे सांगितले. त्यातील १४० मेडिकल विद्यार्थी तेहरानमध्ये शिक्षण घेत आहेत. औवेसी यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. तेलंगणातील या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात आणण्याची मागणी त्यांनी केली. इराण-इस्त्रायल संघर्षामुळे केवळ या २ देशाची नव्हे तर आसपासच्या देशांमधील स्थिती अस्थिर झाली आहे. या देशातील एअरस्पेस बंद आहेत. सातत्याने मिसाईल, ड्रोन हवाई हल्ल्यांच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे इराण आणि इस्त्रायलमधील भारतीय दूतावास कार्यालयाने तिथल्या भारतीय नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :IndiaभारतIranइराणIsraelइस्रायलAbu Azmiअबू आझमीNarendra Modiनरेंद्र मोदी