शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:10 IST

कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलंल नसतं, माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनतेचा उद्रेक झाला होता. त्यानंतर भारतीय हवाई दलाने बालकोट परिसरात एअर स्ट्राईक केलं याचं संपूर्ण श्रेय भारतीय जवानांचे आहे. जवानांच्या शौर्याला सलाम आहे. याआधी देशात अनेक पंतप्रधान झाले असतील. जर कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलंल नसतं, माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे म्हणून मी ठरवलं ज्याठिकाणाहून दहशतवाद्यांचे रिमोट कंट्रोल चालतं तिथेच हल्ला करायचा अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती दिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,  भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. जवानांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्यानेच मी पूर्णपणे जवानांना स्वातंत्र दिले. सगळ्यांनाच माहित आहे दहशतवाद्यांचा मूळ कुठे आहे? दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारलं, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केलं, दहशतवाद्यांचं रिमोट कंट्रोल कुठून चालतं तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. मात्र जगापासून लपविण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलतं म्हणून आम्ही अशा ठिकाणी वार केला त्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.  

माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीला कोणताही अनुभव नसताना देशाने माझ्या हातात पूर्ण बहुमत दिलं. जगात आज जी भारताची ताकद दिसते ती एकट्या मोदींमुळे दिसतेय असं नाही, तर त्या सव्वाशे करोड जनतेने पूर्ण बहुमताने दिलेलं सरकार आहे त्यामुळे जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

 

मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मला दायित्व देऊन पंतप्रधानपदावर बसवलं. मी तेव्हा जनतेला आश्वासन दिलं होतं की जनतेचा पैसा मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही. मी चौकीदाराच्या रुपात आपली जबाबदारी पार पडेन आज मला आनंद होतोय की आज देशातील प्रत्येक नागरिक जो या देशासाठी काम करतोय तो चौकीदार आहे, देशाच्या जनतेला राजा-महाराजांची गरज नाही, चौकीदार हवाय अस मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  चौकीदार ही एक भावना आहे. चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदाराला ना कोणता गणवेश आहे ना कोणतंही बंधन आहे. देशाला हुकूमशहा नको आहे. देशाची जनता चौकीदाराला पसंत करते असं पंतप्रधानांनी सांगितलं. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndiaभारत