शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 23:13 IST

Lok Sabha Election 2024 : पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते.

Narendra Modi Road Show In Patna पाटणा : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दीमुळे रोड शोची एकूण लांबी जवळपास 3.5 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. पाटण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच रोड शो होता.

पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते. लहान मुलांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोस्टर बनवले होते. या रॅलीत उपस्थित अनेकजण राम मंदिराच्या उभारणीमुळे खूश असल्याचे दिसून आले. एका मुलीने सांगितले की, पंतप्रधान सर्वांना समान मानतात म्हणून आम्ही त्यांना पसंत करतो. तर यावेळी एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकण्यात यशस्वी होईल आणि नरेंद्र मोदींचा नारा पूर्ण होईल, असे काही लोकांनी सांगितले.

पाटणा येथील रोड शोपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. अखेर बिहारच्या जनतेने त्यांना रस्त्यावर आणले, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत आणि 2019 मध्ये भाजपाने जेडीयूसोबत येथे 33 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही दोन्ही पक्ष एकत्र आहेत, पण आरजेडी पूर्वीपेक्षा मजबूत आहे आणि एनडीए आघाडीला आपल्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे जाणार नाही. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बिहारमधील पाच जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये दरभंगा, समस्तीपूर, बेगुसराय, उजियारपूर आणि मुंगेर या जागांचा समावेश आहे.

रोड शो करण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मोदींची सभापंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी बिहारमध्ये रोड शो करण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतली. येथे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती देता येईल का?  टीएमसी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी तुष्टीकरणाचे राजकरण करते. येथील तृणमूल आमदाराने हिंदूंना भागीरथीमध्ये बुडवू, असे म्हटले होते. कुणाच्या जीवावर ते एवढी हिंमत करतात? यांनी बंगालमध्ये हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले. तुष्टीकरणासाठी ते एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताहेत." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpatna-sahib-pcपटना साहिबbihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४