शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

राजीव गांधींनी स्वप्न पाहिलं! मोदी पूर्ण करणार; श्रीलंकेच्या सोबतीनं चीनवर नेम साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:51 IST

श्रीलंकेच्या या भागावर चीनची अनेक दिवसांपासून नजर होती. सध्या आर्थिक संकटात असतानाच श्रीलंकेने हा करार केला आहे.

कोलंबो - चीनच्या कर्ज सापळ्यात अडकूण कंगाल झालेल्या श्रीलंकेने भारतासोबत त्रिंकोमाली तेल टँक करार करून ड्रॅगनला मोठा दणका दिला आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे त्रिकोमाली तेल टँक परिसर तयार करणार आहे. धोरणात्मकदृष्ट्या या महत्त्वाच्या करारांतर्गत, त्रिंको पेट्रोलियम टर्मिनल लिमिटेड सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन संयुक्तपणे 61 तेल टँक विकसित करणार आहेत. भारताच्या तामिळनाडू राज्याच्या अगदी जवळ बांधल्या जाणार्‍या या तेल टँक्सचे स्वप्न सर्वप्रथम माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाहिले होते.

श्रीलंकेच्या गोटाबाया राजपक्षे सरकारच्या मंत्रिमंडळाने भारतासोबत त्रिंकोमाली तेल टँक प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. 29 ऑक्टोबर 1987 रोजी भारत-श्रीलंका करारामध्ये या कराराचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता. दोन्ही देश मिळून हा प्रोजेक्ट विकसित करतील, असे सांगण्यात आले होते. पण गेल्या 35 वर्षांपासून हा करार लटकून होता. तेव्हा राजीव गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने यांच्यात पत्रव्यवहारही झाला होता.

अमेरिकेची त्रिंकोमाली बंदराला नवदल तळ बनवण्याची होती इच्छा -श्रीलंकेत सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे हा करार सुमारे 15 वर्षे रखडला. यानंतर 2002 मध्ये नॉर्वेच्या मध्यस्थीने गृहयुद्ध संपले. त्यानंतर अशा बातम्या आल्या होत्या, की अमेरिकेला श्रीलंकेचे त्रिंकोमाली बंदर नौदल तळ बनवायचे आहे, जेणेकरून अफगाणिस्तानात रसद सहजपणे पोहोचू शकेल. यानंतर भारतीय उच्चायुक्तांनी त्रिंकोमालीला भेट दिली. हा तेल टँक दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. येथे दहा लाख टन तेल ठेवले जाऊ शकते.

या तेल टँक साठ्याजवळच त्रिंकोमाली बंदर आहे. त्रिंकोमाली हे चेन्नईचे सर्वात जवळचे बंदर आहे. श्रीलंकेच्या या भागावर चीनची अनेक दिवसांपासून नजर होती. सध्या आर्थिक संकटात असतानाच श्रीलंकेने हा करार केला आहे. चीनच्या कर्ज सापळ्यामुळे महागाई विक्रमी पातळीवर पोहोचली आहे, अन्नधान्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत आणि सरकारी तिजोरी वेगाने रिकामी होत आहे. या वर्षी श्रीलंका दिवाळखोरीत निघण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे चीनचे कर्ज चुकवता-चुकवता श्रीलंकेची कंबर मोडली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSri Lankaश्रीलंकाchinaचीनPetrolपेट्रोल