“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:46 IST2026-04-12T11:45:52+5:302026-04-12T11:46:59+5:30

PM Modi Post On Asha Bhosale: काही महिन्यांपासून आशा भोसले यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात होत्या.

pm narendra modi deeply concerned to hear that asha bhosle has been admitted to hospital | “आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना

“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना

PM Modi Post On Asha Bhosale: ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. इंटर्नल मेडिसीनतज्ज्ञ डॉ. प्रतीत समदानी आणि हृदयविकार तज्ज्ञांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतल्याचे म्हटले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना छातीचा संसर्ग झाल्याने हृदयावर ताण येऊन घरीच हृदयविकाराचा झटका आला. काही वेळ त्या बेशुद्धास्थेत होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सुरुवातीला त्यांना सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. 

आशा भोसले लवकरात लवकर होण्यासाठी प्रार्थना करतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हे ऐकून अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्या लवकरात लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करतो. दुसरीकडे, आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना केली जात आहे.

दरम्यान, काही महिन्यांपासून आशा भोसले यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात होत्या. शनिवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या सोबत सून आणि नात जनाई भोसले होत्या, असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: pm narendra modi deeply concerned to hear that asha bhosle has been admitted to hospital