शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आत्मनिर्भर भारत! मेड इन इंडिया लस देशासाठीही आणि जगासाठीही; पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 12:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 'जनऔषधी दिवस'निमित्ताने देशातील ७ हजार ५०० व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ७५०० जनऔषधी केंद्राचे लोकार्पणजगासाठी भारत औषधाचे केंद्र - पंतप्रधान मोदीदेशवासी एक कुटुंब, एक परिवार - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 'जनऔषधी दिवस'निमित्ताने देशातील ७ हजार ५०० व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवादही साधला. मेड इन इंडिया लस भारतासाठी आणि जगासाठीही असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना केला. (pm narendra modi dedicate 7500th janaushadhi kendra to the nation)

पैसे नाही, म्हणून कोणीही औषधांपासून वंचित राहू नये, यासाठी जनऔषधी केंद्रांची सुरुवात करण्यात आली. जनऔषधी दिवसाच्या निमित्ताने देशाला ७ हजार ५०० वे जनऔषधी केंद्र समर्पित करताना आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती.

ठरलं! PM मोदींच्या रॅलीत मिथुन चक्रवर्ती करणार भाषण; सौरव गांगुलीबद्दल सस्पेंस कायम

जगासाठी भारत औषधाचे केंद्र

कोरोना संकटाशी लढण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीसाठी शास्त्रज्ञ काम करत होते. मात्र, भारतात लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस केवळ भारतीयांसाठी नाही, तर ती जगासाठीही आहे. जागतिक स्तरावर सर्वांत स्वस्त कोरोना लस भारतातून पुरवली जात आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीची किंमत केवळ २५० रुपये आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

देशवासी एक कुटुंब, एक परिवार

संपूर्ण देश मला माझ्या परिवारासारखा आहे. तुम्ही आजारी असाल, तर माझे कुटुंबीय आजारी आहे, असे मला वाटते. म्हणून आरोग्य आणि औषधांच्या अधिकाधिक उत्तमोत्तम सोयी, सुविधा आपल्याला देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जनऔषधी केंद्रांमधून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मदत मिळत आहे. जनऔषधी केंद्रांमुळे सामान्य कुटुंबांची प्रतिवर्ष ५० हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

टॅग्स :medicineऔषधंprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्ली