PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: हनुमंतांप्रमाणे राष्ट्राची सेवा करा; भाजप स्थापनादिनी PM मोदींचे १० लाख कार्यकर्त्यांना संबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:22 AM2023-04-06T11:22:40+5:302023-04-06T11:25:22+5:30

PM Modi Speech On BJP 44th Foundation Day: भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे ही आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

pm narendra modi criticized congress and opposition on bjp 44 foundation day | PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: हनुमंतांप्रमाणे राष्ट्राची सेवा करा; भाजप स्थापनादिनी PM मोदींचे १० लाख कार्यकर्त्यांना संबोधन

PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: हनुमंतांप्रमाणे राष्ट्राची सेवा करा; भाजप स्थापनादिनी PM मोदींचे १० लाख कार्यकर्त्यांना संबोधन

googlenewsNext

PM Modi Speech On BJP Foundation Day 2023: देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच दिवशी भाजपचा स्थापना दिवस आहे. भाजप स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कार्यकर्त्यांना संबोधित केले. रामभक्त हनुमंतांना नमन करत पंतप्रधान मोदी यांनी हनुमानाप्रमाणे राष्ट्राची सेवा करण्याचे आवाहन केले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. हनुमानाचे जीवन आजही प्रेरणादायी ठरत आहे. लक्ष्मणावर संकट आले, तेव्हा हनुमानाने सगळा पर्वत उचलून आणला होता. यातून आपल्याला प्रेरणा मिळते. भाजप लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असते आणि पुढेही करत राहणार, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, असेही मोदी म्हणाले. 

भाजप महिलांचे आयुष्य सोपे बनवण्याला प्राथमिकता देते

भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्यांनी पक्षासाठी त्याग केला, पक्षासाठी जीवन झिजवले, पक्ष जोपासला, बळकट केला, समृद्ध केला, छोट्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ पदापर्यंत देशाची आणि पक्षाची सेवा करणाऱ्या सर्व महान व्यक्तींचे मी मनापासून आभार मानतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती महिलांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या आव्हानांची कदर नाही. पण भाजप महिलांचे आयुष्य सोपे बनवण्याला प्राथमिकता देते, असे मोदी म्हणाले. तसेत हे सगळे वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेयवादाच्या मागे लागला आहे. भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन जाणारी आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्ने बघायची आणि त्याहून छोटे यश मिळवून आनंद साजरा करायचा तसेच एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने बघणे आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीव तोडून मेहनत करणे ही आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, १९४७मध्ये इंग्रज निघून गेले. पण जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता इथेच काही लोकांच्या डोक्यात सोडून गेले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये देशात असा वर्ग मोठा झाला, जो सत्तेला आपला जन्मजात हक्क समजत होता. या लोकांच्या बादशाही मानसिकतेने देशाच्या जनतेला नेहमीच आपली गुलाम मानले. २०१४ मध्ये या दबलेल्या, शोषित-वंचित वर्गाने आपला आवाज उठवला. बादशाही मानसिकतेचे लोक या वर्गाचा आवाज ऐकणे तर सोडून द्या, पण पायदळीच तुडवत राहिले. त्यामुळेच आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच बादशाही मानसिकतेच्या लोकांनी शोषित, वंचित, दलित, मागास लोकांची टर उडवण्याची एकही संधी सोडली नाही, अशी टीका मोदींनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: pm narendra modi criticized congress and opposition on bjp 44 foundation day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.