शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

16 जानेवारीला नरेंद्र मोदी कोरोना लसीकरणची मोहीम सुरू करणार, को-विन अ‍ॅपही लाँच केलं जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 2:24 PM

corona vaccination : राजधानी दिल्लीत लोकनारायण जय प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंद व्यक्त केला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते को-विन अ‍ॅप देखील लाँच करण्यात येणार आहे. 16 जानेवारीपासून देशात कोरोना व्हायरसच्या विरोधात लसीकरणांची मोठी मोहीम सुरू होणार आहे.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअलरित्या या कोरोना लसीकरणाच्या मोहिमेची सुरूवात करण्याची शक्यता आहे. यादरम्यान, देशातील विविध राज्यात एकाच वेळी लसीकरण सुरू केले जाणार आहे. 

राजधानी दिल्लीत लोकनारायण जय प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या कार्यक्रमास उपस्थित राहू शकतात.

याशिवाय, कोरोना लस साठवलेल्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही ही मोहीम सुरू केली जाईल. दरम्यान, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसांना मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी लसीचा पुरवठा सुरू झाला होता आणि आता ही लस देशातील प्रत्येक राज्यात दिली जात आहे. 

16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचे काम भारतात अनेक टप्प्यात करावे लागणार आहे. सध्या 3 कोटी कोरोना वॉरियर्सना लस दिली जाईल. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना ही लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज महाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आनंद व्यक्त केला. लस आपल्या पुण्याच्या मुख्य डेपोतून आपल्या आठ ठिकाणी पोहोचत आहेत. आठ डेप्युटी ऑफिसमध्ये मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला या ठिकाणी लस पोहोचणार आहे. या ठिकाणी 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवता येईल, असे बॉक्स घेऊन अधिकारी येतील. त्यांच्या जिल्ह्याच्या कोटा त्या ठिकाणाहून नेला जाणार. ही प्रक्रिया 14 तारखेपर्यंत पूर्ण होईल. 15 तारखेपर्यंत सर्व रुग्णालयांमध्ये कोल्ड चेन युनिट असलेल्या ठिकाणी या लसी पोहोचतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

नोंदणीनुसार प्रत्येक केंद्रात 100 जणांना लसकोरोनाची लस फ्रंटलाइन वर्कर्स यांना देण्यात येणार आहे. कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाइलवर संदेश आल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेऊन लस दिली जाणार आहे. एका दिवशी एका केंद्रात जवळपास 100 जणांना कोरोना लस देण्यात येणार आहे, असे राज्यातील आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे