सुषमा स्वराज यांनी 'प्रोटोकॉल'ला 'पीपल्स कॉल'मध्ये परावर्तित केलं- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 20:34 IST2019-08-13T20:34:11+5:302019-08-13T20:34:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला.

PM Narendra Modi at the condolence meet for late former Union Minister & BJP leader Sushma Swaraj in Delhi | सुषमा स्वराज यांनी 'प्रोटोकॉल'ला 'पीपल्स कॉल'मध्ये परावर्तित केलं- नरेंद्र मोदी

सुषमा स्वराज यांनी 'प्रोटोकॉल'ला 'पीपल्स कॉल'मध्ये परावर्तित केलं- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुषमाजींनी 'प्रोटोकॉल'ला 'पिपल्स कॉल'मध्ये बदलल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज देश-परदेशात अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी तत्पर असायच्या. परदेशातल्या भारतीयांवर संकट ओढावल्यानंतर त्या मदतीसाठी नेहमीच पुढे येत होत्या. प्रोटोकॉलशी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याला त्यांनी पीपल्स कॉलमध्ये परावर्तित केल्याचा उल्लेखही मोदींनी आवर्जून केला आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.


सुषमाजींना जी जी खाती मिळाली, त्या खात्यात त्यांनी उत्कृष्ट काम करून दाखवलं. त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा कायापालट करून त्याचा कारभार पारदर्शक केला आहे. परराष्ट्र मंत्रालय हे सदोदित प्रोटोकॉलशी निगडीत असतं. सुषमाजींनी त्याच्या एक पाऊल पुढे टाकत प्रोटोकॉल खात्याचं एका फोनवर लोकांना मदत करणाऱ्या खात्यात  'पीपल्स कॉल'मध्ये रुपांतर केलं.  
 यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते सभेत हजर होते. स्वराज यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांच्यापाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ट्विटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत त्याचाही निपटारा केला, असं मोदी म्हणाले. 

Web Title: PM Narendra Modi at the condolence meet for late former Union Minister & BJP leader Sushma Swaraj in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.