गीरच्या जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅमेऱ्यात टिपला जंगलाचा राजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 10:09 IST2025-03-04T10:08:16+5:302025-03-04T10:09:25+5:30
गीरच्या जंगलात पंतप्रधानांनी छायाचित्रेही टिपली.

गीरच्या जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅमेऱ्यात टिपला जंगलाचा राजा
सासण: आशियाई सिंहांच्या अधिवासाचे ठिकाण म्हणून गुजरातमधील गीरचे जंगल प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सोमवारी गीरमध्ये जाऊन जंगलचा राजा म्हणजे सिंहांचे निरीक्षण केले. तसेच गीरच्या जंगलात पंतप्रधानांनी छायाचित्रेही टिपली.
त्यांनी म्हटले आहे की, आशियाई सिंहांची संख्या वाढत आहे. त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यात आदिवासी व अन्य संबंधित लोकांचेही मोठे योगदान आहे.
भारतामध्ये वन्यजीवांच्या रक्षणासाठी झालेली उत्तम कामगिरी अभिमानास्पद आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त एका संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर आता गुजरातमधील बन्नीचा गवताळ प्रदेश तसेच गांधीसागर अभयारण्यातही चित्त्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मोदी यांनी सोमवारी केली. (वृत्तसंस्था)
भारतीय नद्यांमध्ये आहेत तब्बल ६,३२७ डॉल्फिन
भारतीय नद्यांमध्ये ६,३२७ डॉल्फिन आहेत. डॉल्फिनबाबतचा हा देशातील अशा प्रकारचा हा पहिला अहवाल आहे. त्यासाठी आठ राज्यांमधील २८ नद्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. उत्तर प्रदेशातील नद्यांत सर्वाधिक डॉल्फिन असून त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो.