शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 10:39 IST

माध्यमांतील वृत्तांनुसार, पीएम मोदी सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. ते तेथे साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. ते तेथील सूर्यास्त बघतील आणि नतंर ध्यानाला बसतील. यानंतर, ततते १ जूनला दुपारी ३:३० वाजता कन्याकुमारीहून परततील. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमारी आज शांत होणार आहे. आज आखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ तासांच्या ध्यानासाठी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये जातील. येथे त्यांच्या कार्यक्रमासंदर्भात जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या ध्यान-धारणेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी सुमारे 2,000 पोलीस कर्मचारी आणि संरक्षण संस्था तैनात करण्यात येणार आहेत.

निर्धारित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान मोदी ३० मेच्या सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तेथे पोहोचतील. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणीही घेण्यात आली आहे.

असा असेल संपूर्ण कार्यक्रम माध्यमांतील वृत्तांनुसार, पीएम मोदी सर्वप्रथम तिरुअनंतपुरमला पोहोचतील आणि तेथून एमआय-१७ हेलीकॉप्टरने कन्याकुमारीला जातील. ते तेथे साधारणपणे सायंकाळी ४:३५ वाजता पोहोचतील. ते तेथील सूर्यास्त बघतील आणि नतंर ध्यानाला बसतील. यानंतर, ततते १ जूनला दुपारी ३:३० वाजता कन्याकुमारीहून परततील. 

विवेकानंद रॉकच का? -असे मानले जाते की स्वामी विवेकानंदांना येथेच दिव्य ज्ञान प्राप्त झाली होते, यामुळे हे ठिकाण पंतप्रधान मोदींच्या ध्यानासाठी निवडण्यात आले आहे. एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि एखाद्या भिक्षुच्या जीवनात गौतम बुद्धांच्या सारनाथ प्रमाणेच या ठिकाणाचेही महत्व आहे. विवेकानंद संपूर्ण देशाचे भ्रमण करून येथे पोहोचले, तीन दिवस ध्यानधारणा केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४