PM Narendra Modi at Adampur Aairbase : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर पंतप्रधान मोदींनी काल(12 मे) राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यानंतर आता आज (13 मे) पहाटे ते अचानक आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या जवानांची भेट घेऊन ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा आणि त्यांचे अभिनंदन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सैनिकांशी 6 मे च्या रात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दलही चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट देणे खूप खास मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने हा एअरबेस उडवल्याचा दावा केला होता. पीएम मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते आपल्या सैनिकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.