शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनानिमित्त मोदींची मोठी घोषणा; पीएम श्री योजनेंतर्गत 14,500 शाळा होणार अपग्रेड, जाणून घ्या काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:27 IST

PM-SHRI : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही तर त्यांचे जीवनही बदलायचे आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत देशभरात 14,500 शाळा विकसित केल्या जाणार आहेत. या सर्व मॉडेल शाळा बनतील आणि यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्ण भावना अंतर्भूत असणार आहे. दरम्यान, शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशीही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला केवळ विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही तर त्यांचे जीवनही बदलायचे आहे.

पीएम श्री योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात बरेच बदल केले आहेत. पीएम श्री स्कूल एनईपीच्या भावनेने देशातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होईल. या शाळांमध्ये आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण शिक्षण देण्याची पद्धत असेल. याशिवाय, नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास रूम, क्रीडा आणि आधुनिक पायाभूत सुविधांकडेही लक्ष दिले जाणार आहे.

दरम्यान, या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण असेल. पीएम श्री योजनेमध्ये लागू केल्या जाणार्‍या एनईपी तरतुदी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा प्रत्येक वर्गात नवीन शिकण्यावर अधिक भर देतील. या शाळांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक तसेच पुस्तकी ज्ञानही शिकता येईल.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्वप्रथम जूनमध्ये पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार पीएम श्री शाळांसाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी जुन्या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यात येणार आहे. हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर चालवले जातील. पीएम श्री शाळांचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तर, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEducationशिक्षणSchoolशाळा