शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चौकीदार से चर्चा! पंतप्रधान मोदी साधणार 25 लाख चौकीदारांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 08:48 IST

देशाच्या विविध भागातील चौकीदारांशी मोदी साधणार संवाद

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी साडे चार वाजता मोदी ऑडिओच्या माध्यमातून चौकीदारांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी 'मैं भी चौकीदार' कॅम्पेन सुरू केलं आहे. होळीच्या पूर्वसंध्येला मोदी चौकीदारांशी साधत असलेला संवाद याच कॅम्पेनचा भाग असेल, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे. मोदी होळीचा आनंद देशभरातील चौकीदारांसोबत साजरा करतील, असं भाजपाचे माध्यम संपर्क प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी यांनी सांगितलं. यानंतर 31 मार्चला मोदी देशभरातील 500 ठिकाणच्या लोकांशी संवाद साधतील. भाजपाच्या मै भी चौकीदार मोहिमेत सहभागी झालेल्या लोकांना मोदी संबोधित करणार आहेत. मोदींनी ट्विटरवर सुरू केलेल्या मै भी चौकीदार मोहिमेत समाजाच्या सर्वच स्तरातील भरभरुन प्रतिसाद दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. मोदींनी शनिवारी ट्विटरवर मै भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. मोदींनी सुरू केलेल्या कॅम्पेनला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपानं दिली. आतापर्यंत 20 लाख लोकांनी ट्विटरवर #MainBhiChowkidarचा वापर केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. सोशल मीडिया आणि नमो ऍपच्या माध्यमातून एक कोटी लोक या कॅम्पेनमध्ये सहभागी झाल्याची माहिती पक्षानं दिली. 'मोदींनी सुरू केलेल्या मोहिमेचं रुपांतर आता लोकांच्या चळवळीत झालं आहे. यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील लोक अगदी उत्साहानं आणि आनंदानं सहभागी होत आहेत,' असं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा