शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:59 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा काढला आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदींना अभिभाषणावरील उत्तरही देता आले नाही. 

४  फेब्रुवारी रोजी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तर देणार होते. पण, पंतप्रधान मोदी येण्यापूर्वीच सभागृहात झालेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचे भाषण होऊ शकले नाही. काँग्रेसचे खासदार अनुसूचित प्रकार करणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे पंतप्रधानांना न येण्याची विनंती केल्याचे नंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही म्हटलं होतं. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या गदारोळाचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. भाजपाच्या नेत्यांकडून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

पंतप्रधानांच्या उत्तराच्या भाषणाशिवाय यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर केला गेला. त्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा झाली आणि वेगवेगळे अर्थ काढले गेले. ४ फेब्रुवारी लोकसभेत झालेल्या गदारोळाचा आणि काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाजवळ गेल्यानंतरचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. 

लोकसभेत त्यादिवशी काय घडले?

जो नवीन व्हिडीओ समोर आला आहे, त्यात काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधान बसतात तिथल्या आसनाजवळ येताना दिसत आहे. महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ आल्यानंतर भाजपाचे खासदार त्यांच्याशी बोलताना दिसत आहे. महिला खासदार मोठ्या संख्येने तिथे आल्यानंतर भाजपाचे खासदार निघून जाताना दिसत आहे.

तर खूप वाईट दृश्य दिसले असते

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, "काँग्रेसला त्यांच्या खासदारांकडून करण्यात आलेल्या वाईट वर्तणुकीचा अभिमान वाटत आहे. आम्ही जर आमच्या खासदारांना थांबवले नसते आणि महिला खासदारांना काँग्रेसच्या खासदारांशी सामना करू दिला असता, तर खूप वाईट दृश्य दिसले असते. पण, आम्ही संसदेचे पवित्रता आणि प्रतिष्ठा यांचा सन्मान ठेवतो."

भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनीही एक पोस्ट करत म्हटले की, "राहुल गांधीजी, तुम्ही कट रचला. महिला खासदार संसदेमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव कसा घालू शकतात? ही संविधानासोबत छेडछाड नाहीये का? भाजपाच्या खासदारांची मर्यादा आणि शालीनता बघा. अशा परिस्थितीतही त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी स्वतःवरचा ताबा सुटू दिला नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Video surfaces: Congress MPs' actions prevented PM Modi's Parliament address.

Web Summary : A video shows Congress MPs near PM's seat before his address. Disruption prevented Modi's speech on February 4th. BJP leaders accuse Congress of disrespecting Parliament; defending their actions.
टॅग्स :ParliamentसंसदBudgetअर्थसंकल्प २०२६BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस