रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याच्या बातमीने जगभरात गोंधळ उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'मॉस्कोच्या उत्तरेकडील नोव्हगोरोड प्रदेशात ९१ लांब पल्ल्याच्या युक्रेनियन ड्रोनने पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा दावा रशियाने केला आहे.
"रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तांमुळे मला खूप चिंता वाटली. शत्रुत्व संपवण्याचा आणि शांतता प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सतत राजनैतिक प्रयत्न करणे हाच आहे. आम्ही सर्व संबंधितांना या प्रयत्नांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आणि त्यांना कमजोर करणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन करतो", असे पीएम मोदी यांनी लिहिले आहे.
पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा दावा
युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्हगोरोड येथील शासकीय निवासस्थानावर थोडे थोडके नव्हे तर ९१ लांब पल्ल्याच्या ड्रोननी हल्ला केल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "आज सकाळी स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हे अजिबात चांगले नाही. युद्धाच्या मैदानात लढणे एक गोष्ट आहे, पण थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरावर हल्ला करणे ही वेगळी गोष्ट आहे. मी या घटनेमुळे खूप संतापलो आहे." ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, ही वेळ अशा प्रकारच्या हल्ल्यांची नाही, कारण आपण शांतता कराराच्या अगदी जवळ आहोत.
दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "रशिया शांतता प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी आणि युक्रेनवर मोठे हल्ले करण्यासाठी हे बनाव रचत आहे," असे झेलेन्स्की म्हणाले. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, पुतिन यांच्या निवासावर तब्बल ९१ ड्रोन डागण्यात आले होते आणि या घटनेला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
Web Summary : PM Modi expressed concern over alleged attacks on Putin's residence, urging peaceful diplomatic efforts. Russia claims Ukraine used 91 drones. Trump says Putin called him about the attack and Zelenskyy denies involvement, accusing Russia of fabrication.
Web Summary : पीएम मोदी ने पुतिन के आवास पर कथित हमलों पर चिंता व्यक्त की, शांतिपूर्ण राजनयिक प्रयासों का आग्रह किया। रूस का दावा है कि यूक्रेन ने 91 ड्रोन का इस्तेमाल किया। ट्रम्प ने कहा कि पुतिन ने उन्हें हमले के बारे में फोन किया और जेलेंस्की ने शामिल होने से इनकार किया, रूस पर मनगढ़ंत कहानी रचने का आरोप लगाया।