शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेलोनी यांच्यासोबतच्या फोटोंवरून होणाऱ्या मीम्सबाबत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:02 IST

Narendra Modi & Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे काही आंतरराष्ट्रीय परिषदांवेळचे फोटो सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. तसेच त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच त्यावरून मिम्सही तयार झाले होते. दरम्यान, निखिल कामत यांनी घेतलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदीं यांनी या फोटोंवर तयार झालेल्या मिम्सबाबत मोठं विधान केलं आहे.

भारताचेपंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे जगातील अनेक देशांच्या प्रमुखांसोबत मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो हे अनेकदा व्हायरल होत असतात. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे काही आंतरराष्ट्रीय परिषदांवेळचे फोटो सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. तसेच त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच त्यावरून मिम्सही तयार झाले होते. दरम्यान, निखिल कामत यांनी घेतलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदीं यांनी या फोटोंवर तयार झालेल्या मिम्सबाबत मोठं विधान केलं आहे.

या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटोंवरून तयार होणाऱ्या मिम्स पाहता का? असे विचारले असता नरेंद्र मोदी म्हणाले की, अशा गोष्टी चालत राहतात. मी त्यामध्ये माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही, असे सांगितले. 

यावेळी जगभरात भारताची प्रतिष्ठा कशी वाढली आहे, याचं उदाहरण देताना नरेंद्र मोदी यांनी सांगिते की, एखाद्या देशात आमचा राजदूत हा नंतर जातो. मात्र तिथे राहणारे भारतीय हे आमच्यासाठी राष्ट्रदूत आहेत. आम्ही त्यांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे आमची ताकद ही कैकपटीने वाढली आहे. जगभरातील भारतीयांना एकत्र आणणं हे नीती आयोगाच्या उद्देशांमध्ये सर्वात मोठा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुलाखतीमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना अनेक रोचक प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनीही या प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. पहिल्या टर्ममध्ये मी दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या टर्ममध्ये हे सगळं अधिक चांगले समजू लागले, असं पंतप्रधान मोगी म्हणाले. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.

राजकारणातील तरुणांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे, असं म्हटलं. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. "चुका होतात, माझ्याकडूनही त्या झाल्या असतील. मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही," असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तेव्हापासून मोदींच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया