शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल", अमित शाहांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 23:39 IST

काँग्रेस सध्याच्या जागांपेक्षा कमी आकडा गाठेल, असा दावाही अमित शाह यांनी केला.

गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा  पंतप्रधान होतील, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस सध्याच्या जागांपेक्षा कमी आकडा गाठेल, असा दावाही अमित शाह यांनी केला. गुरुवारी अमित शाह यांनी गुवाहाटीमध्ये 44 हजार 703 तरुणांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 

अमित शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस अत्यंत नकारात्मक वृत्तीचे राजकारण करत आहे. या नकारात्मक वृत्तीने काँग्रेस नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात 300 हून अधिक जागा जिंकेल आणि काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जाही गमावेल, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

अमित शाह म्हणाले की, नकारात्मक राजकारणामुळे काँग्रेस नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी सबब पुढे करत बहिष्कार टाकत आहे. मात्र, काँग्रेस आणि विरोधी शासित राज्यांमध्ये अशी अशी उदाहरणे समोर आली आहेत, जिथे राज्यपालांशिवाय संबंधित मुख्यमंत्री, काँग्रेस नेते जसे की सोनिया गांधी-राहुल गांधी यांसारख्या नेत्यांनी नवीन विधानसभांचे उद्घाटन केले आहे. 

याचबरोबर, अमित शाह यांनी आसामच्या मागील सरकारांवरही निशाणा साधला. ज्या आसाममध्ये पूर्वी कर्फ्यू अनेक महिने लागू होता आणि गोळीबाराच्या घटना घडत होत्या, त्याच आसाममध्ये आता विकासाची चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विकासाचे नवे पर्व सुरू केले आहे, असे अमित शाह म्हणाले. 

दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला बहुतांश विरोधी पक्ष विरोध करत आहेत. संसदेच्या नवीन भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. काँग्रेससह जवळपास 20 विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस