शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला मिळणार 'इतक्या' जागा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 12:44 IST

उत्तर प्रदेशात भाजपाला सर्वाधिक फटका बसेल असं आकडेवारी सांगते

नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभात विरोधी पक्षांमधील मोठे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशातील फूलपूर आणि गोरखपूरमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज एकत्र आले होते. त्यावेळी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच देशभरात विरोधक एकत्र आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ते किती मोठं आव्हान ठरेल, याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली आहे. 2014 मध्ये भाजपानं ज्या 282 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला, त्या मतदारसंघांमध्ये विरोधक एकत्र आले, तर नेमकं काय चित्र दिसेल, याची आकडेवारी अतिशय रंजक आहे. कर्नाटकमध्ये मोदींविरोधात जे पक्ष एकत्र आले, त्यांची एकजूट पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास भाजपाच्या एकूण 56 जागा कमी होतील. त्यामुळे भाजपाच्या जागा 226 वर येतील. मात्र तरीही भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरेल. विरोधक एकत्र आल्यास भाजपाला सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत याठिकाणी भाजपाला 71 जागा मिळाल्या होत्या. मात्र उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्यास भाजपाच्या जागा 46 वर येतील. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पक्ष एकत्र येऊनही त्याचा परिणाम भाजपाच्या आकडेवारीवर होणार नाही. 2014 मध्ये भाजपानं महाराष्ट्रात 23 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. विरोधक एकत्र लढल्यास भाजपाची एकही जागा कमी होणार नाही. ही संपूर्ण आकडेवारी भाजपा आणि विरोधकांना 2014 मध्ये मिळालेल्या मतांवर अवलंबून आहे. मात्र 2014 मध्ये काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी मतदार केलं होतं. त्यावेळी मोदींनी स्वत:ला सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर ठेवलं होतं. मात्र आता मोदींच्या 5 वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन करुन जनता मतदान करेल. त्याचा मोठा परिणाम आकडेवारीवर दिसू शकतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीmayawatiमायावतीSonia Gandhiसोनिया गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवPoliticsराजकारणkumarswamyकुमारस्वामी