नवी दिल्ली: पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्त्वपूर्ण राजनैतिक पाऊल उचलले. पंतप्रधान मोदींनी प्रथम संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेदरम्यान मोदींनी वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करत तणाव कमी करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिला.
इराणकडून यूएईवर झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात भारत यूएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.
भारतीय समुदायाची सुरक्षायूएईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दल मोदींनी शेख मोहम्मद बिन जायद यांचे आभार मानले. अबू धाबीतील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेला भारतीय नागरिक आता धोक्याबाहेर आहे.
शांततेचे आवाहनइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी झालेल्या संवादात मोदींनी नागरिक आणि निष्पापांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. युद्ध लवकरात लवकर थांबवून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हल्ल्यांची भीषणतायूएई सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणने आतापर्यंत १६५ बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ५४१ ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून ५८ जण जखमी झाले आहेत.
ट्रम्प यांनी इस्रायल, बहरीन आणि युएईच्या नेत्यांशी चर्चा मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल, बहरीन आणि युएईच्या नेत्यांशी चर्चा केली. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी एक्स वर ही माहिती शेअर केली. त्यांच्या एक्स. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आज, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल, बहरीन आणि युएईच्या नेत्यांशी चर्चा केली. टेक्सासमधील ऑस्टिनमधील गोळीबाराची माहितीही राष्ट्रपतींना देण्यात आली."
Web Summary : Amidst escalating Middle East tensions, PM Modi spoke with UAE and Israeli leaders, emphasizing de-escalation and citizen safety. He condemned attacks on the UAE, assuring support and prioritizing Indian community security. Modi urged dialogue for resolving the conflict.
Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के बीच, पीएम मोदी ने यूएई और इजराइल के नेताओं से बात की, जिसमें तनाव कम करने और नागरिकों की सुरक्षा पर जोर दिया गया। उन्होंने यूएई पर हमलों की निंदा की, समर्थन का आश्वासन दिया और भारतीय समुदाय की सुरक्षा को प्राथमिकता दी। मोदी ने संघर्ष के समाधान के लिए बातचीत का आग्रह किया।