शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'जामिनावर बाहेर असलेले माय-लेक नोटाबंदी का केली ते विचारताहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:26 IST

पंतप्रधान मोदींची राहुल आणि सोनिया गांधींवर सडकून टीका

मंदसौर: कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन जामिवावर फिरणारे माय-लेक नोटाबंदी का केली असा आम्हाला विचारतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधींना लक्ष्य केलं. तुमचे गैरव्यवहार लोकांसमोर आणण्यासाठीच आम्हाला नोटाबंदी करावी लागली, अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये बोलत होते. काँग्रेस पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांची फौज असल्याची टीका मोदींनी केली. 'खोटं बोलणाऱ्यांची फौज सध्या इतकं खोटं बोलतेय की त्यातही ते संभ्रमात पडतात, असा टोला त्यांनी लगावला. 'दिल्लीतल्या एसी खोलीत बसणाऱ्या लोकांना निवडणुकीचा अंदाज नाही. मध्य प्रदेशातभाजपाचं सरकार आणण्याचा निश्चय जनतेनं केला आहे. माझ्या समोर असलेली गर्दी हेच सांगते,' असं मोदींनी म्हटलं. सरदार वल्लभभाई पटेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं नेते होते. जर ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर शेतकरी उद्ध्वस्त झाला नसता, असं पंतप्रधान म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांना सांगितलं. 'आज देशात खताची समस्या कमी झाली. हे काम भाजपा सरकारनं केलं. काँग्रेसच्या 55 वर्षांच्या सत्ताकाळात जितकं सिंचन झालं, त्यापेक्षा पाचपट सिंचनाचं काम गेल्या 15 वर्षांमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं केलं. काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलं. मात्र आम्ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं,' असा दावादेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस