शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 22:26 IST

नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करण्यास सुरुवात केली असून ते पुढील ४५ तास या अवस्थेत राहणार असल्याचे समजते.

PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळच्या सुमारास तामिळनाडू इथं पोहोचले. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान करण्यास सुरुवात केली असून ते पुढील ४५ तास या अवस्थेत राहणार असल्याचे समजते. या काळात ते मौन राहणार असून त्यांचा आहारही फक्त नारळाचं पानी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सायंकाळपासून १ जूनच्या सायंकाळपर्यंत तेथे ध्यान करतील. हे दोन दिवस पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी मिळणार नाही. गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद राहणार असून खासगी बोटींनाही तेथे जाण्याची परवानगी नसेल. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तेथे पोहोचतील. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँडिंगची चाचणीही घेण्यात आली आहे.

दरम्यान, आज सायंकाळी तामिळनाडू इथं दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम भगवती अम्मन मंदिर इथं पूजा केली. त्यानंतर ते विवेकानंद रॉक मेमोरियल इथं पोहोचले. ध्यान केल्यानंतर १ जून रोजी ते तामिळनाडूतून निघण्याआधी येथील संत तिरुवल्लुवर यांच्या ठिकाणाचाही दौरा करण्याची शक्यता आहे.

विवेकानंद रॉकच का?  

असे मानले जाते की स्वामी विवेकानंदांना येथेच दिव्य ज्ञान प्राप्त झाली होते, यामुळे हे ठिकाण पंतप्रधान मोदींच्या ध्यानासाठी निवडण्यात आले आहे. एका भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींनी ध्यानासाठी निवडलेल्या या खडकाचा विवेकानंदांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि एखाद्या भिक्षुच्या जीवनात गौतम बुद्धांच्या सारनाथ प्रमाणेच या ठिकाणाचेही महत्व आहे. विवेकानंद संपूर्ण देशाचे भ्रमण करून येथे पोहोचले, तीन दिवस ध्यानधारणा केली आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४