बांगलादेशमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा; लोकसभेमध्ये भाजप खासदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:46 IST2024-12-05T08:45:56+5:302024-12-05T08:46:47+5:30
देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा; लोकसभेमध्ये भाजप खासदारांची मागणी
नवी दिल्ली : बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी उज्जैन येथील भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांनी बुधवारी लोकसभेत केली. देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे.
लोकसभेत शून्य प्रहरात फिरोजिया यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, चिन्मय यांच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी बांगलादेशमध्ये एकही वकील उपलब्ध झाला नाही. मथुरा येथील भाजपच्या खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सांगितले की, धर्माचा अपमान, हिंसाचार, अन्याय या गोष्टी कधीही कोणीही खपवून घेता कामा नये. चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेच्या मुद्द्याबाबत आम्ही गप्प बसणार नाही.
दहशतवादी हल्ल्याची शक्यता : ब्रिटन
बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून त्या देशात प्रवास करताना सतर्क राहावे अशी सूचना ब्रिटन सरकारच्या फॉरिन, काॅमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिसने (एफसीडीओ) केली आहे. आवश्यकता असेल तरच त्या देशात जावे असेही एफसीडीओने म्हटले आहे.
हक्कांचे बांगलादेशने रक्षण करावे : अमेरिका
nबांगलादेशमधील अल्पसंख्याकांच्या धार्मिक, मानवी हक्कांचे रक्षण तेथील सत्ताधाऱ्यांनी करावे असे आवाहन अमेरिकेने गुरुवारी केले आहे.
nअमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, आपल्या नागरिकांचे मूलभूत अधिकार जपणे हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे.