शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"मुंबईतील मजुरांना मोफत तिकिटे देऊन यूपी, बिहारमध्ये पाठवले; महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशभर पसरला कोरोना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 06:07 IST

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला.

नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच त्या राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, दिल्लीच्या सरकारनेही मजुरांना ते शहर सोडायला सांगितले व त्यांच्यासाठी अनेक बसची व्यवस्था केली. याचा परिणाम पंजाब, उत्तराखंडमध्येही कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला.मोदी यांनी सांगितले की, मेक इन इंडिया मोहिम कशी यशस्वी होणार नाही हे काँग्रेसने सांगत आहे. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होत नाही. मेक इन इंडियामधून पैसे उकळणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे काँग्रेसचा तिळपापड होत आहे.

फोडा आणि झोडा हेच काँग्रेसचे धोरणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस हा तुकडे तुकडे गँगचा लीडर आहे. फोडा आणि झोडा हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसनेच तामिळी जनतेच्या भावनांचा अवमान केला होता. अनेक अतिशय चुकीच्या गोष्टी या पक्षाने आजवर केल्या आहेत. अजून १०० वर्षे तरी आपण सत्तेत येणार नाही अशा मानसिकता काँग्रेसने केली आहे. तसे असेल तर आम्हीही त्यांना सत्तेवर येऊ न देण्याची तयारी केली आहे.

छोट्या शेतकऱ्यांच्या विरोधात काही मंडळी, विरोधक कट रचत आहेत. देशातील छोट्या शेतकऱ्यांना भक्कम पायावर उभे करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मात्र काही जण शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करत आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

काँग्रेसचा अहंकार कायममोदी म्हणाले की, अनेक राज्यांत काँग्रेसचा पराभव झाला. तरी तो पक्ष आपला अहंकार सोडायला तयार नाही. आत्मनिर्भर भारत निर्माण व्हावा अशी काँग्रेसची इच्छा दिसत नाही. काँग्रेसने कधीही महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले नाही. लोकलसाठी व्होकल होणे हे गांधींजींचे स्वप्न आम्ही पूर्ण करताना विरोधक आडकाठी आणत आहेत.

‘काँग्रेसने सत्तेवर येण्याची इच्छाशक्ती गमावली’ -तेलंगणाची निर्मिती काँग्रेसनेच केली तरी तेथील जनता पक्षाला स्वीकारायला तयार नाही. काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छाशक्तीच गमावली आहे. एखाद्याच्या मनासारखे होत नसेल तर तो गोष्टी नासवण्याच्या मागे लागतो, अशा कठोर शब्दात मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस