शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बघेल सरकारची उलटी गणती; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, ओबीसींकडे काँग्रेसचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 09:27 IST

मुंगेली व महासमुंद जिल्ह्यात  प्रचारसभांमध्ये पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड लुटणे व स्वतःची तिजोरी भरणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे.

मुंगेली/महासमुंद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर भ्रष्टाचार तसेच इतर मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत छत्तीसगडमधून काँग्रेसच्या बघेल सरकारची बाहेर पडण्याची उलटी गणती सुरू झाल्याचे सांगितले.

मुंगेली व महासमुंद जिल्ह्यात  प्रचारसभांमध्ये पंतप्रधान म्हणाले की, छत्तीसगड लुटणे व स्वतःची तिजोरी भरणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र आणि इतर नातेवाइक अधिकाऱ्यांनी ‘सुपर सीएम’ बनून राज्यकारभार चालवला. अनेक वर्षे ‘पंचायत ते संसदेपर्यंत’ सत्तेत असूनही काँग्रेसने ओबीसींसाठी आरक्षण लागू केले नाही.

मुख्यमंत्री पराभूत होणारबघेल स्वतः विधानसभा निवडणुकीत हरणार आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, “काँग्रेसलाही लक्षात आले आहे की, आता छत्तीसगडमध्ये आपली वेळ संपली आहे. दिल्लीतील काही पत्रकार मित्र आणि राजकीय विश्लेषकांनी मला सांगितले की मुख्यमंत्री स्वतः हरणार आहेत.”

नेत्यांनाही डावलले बघेल आणि टी. एस. सिंग देव यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या कथित करार झाला, परंतु त्यांची अंमलबजावणी कधीच झाली नाही, काँग्रेसचा खरपूस समाचार घेत मोदी म्हणाले की, जो पक्ष आपल्याच वरिष्ठ नेत्यांना डावलतो तो लोकांना फसवणारच. 

टॅग्स :chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा